High Court Updates on Nitesh Rane Case
High Court Updates on Nitesh Rane Case Sakal
महाराष्ट्र

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली; उद्या निकालाची शक्यता

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : संतोष परब (Santosh Parab) यांच्यावरील कथीत जीवघेणा हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामिनावर मुंबई हायकोर्टाकडून (Mumabi High Court) आजही निकाला येऊ शकला नाही. या प्रकरणी आता उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, नितेश राणे यांना उद्यापर्यंत अटकेपासून दिलासा कायम असणार आहे. (Nitesh Rane prearrest bail hearing to be held tomorrow)

हायकोर्टाचं कामकाज सध्या दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत सुरु आहे. तीन वाजता कोर्टाची वेळ संपल्यानं आजचं कामकाज थांबवण्यात आलं. दरम्यान, नितेश राणेंच्या वकिलांकडून त्यांची बाजू आज मांडण्यात आली. यानंतर आता उद्या दुपारी एक वाजता या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे.

या अटकपूर्व जामिनावर जोपर्यंत मुंबई हायकोर्टा आपला निकाल देत नाही तोपर्यंत नितेश राणे यांच्यासह अन्य आरोपींविरोधात कुठलीही कठोर कारवाई होणार नाही, अशी ग्वाही राज्य शासनानं हायकोर्टात दिली आहे. याची नोंद घेत हायकोर्टानं उद्या दुपारी सुनावणी घेण्याच निश्चित केलं आहे.

दरम्यान, आजच्या सुनावणीत नितेश राणे यांच्या वकिलांकडून अटकपूर्व जामीन अर्जावर युक्तीवाद पूर्ण करण्यात आला. यावेळी त्यांनी हे प्रकरण निव्वळ राजकीय वैमन्यस्यातून उकरुन काढत नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला. विधानभवनातील म्याव म्याव प्रकरणानंतर जुन्या प्रकरणावरुन त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केल्याचं यावेळी राणेंच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT