Corona-MH 
महाराष्ट्र बातम्या

Coronavirus : राज्यातील चाचणीचे निकष बदलले; दिवसभरात रुग्णांची संख्या पोहोचली...

सकाळ वृत्तसेवा

Coronavirus : मुंबई : राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला असून, राज्यभरात शनिवारी (ता.२१) एकूण १२ नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे बाधित रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. त्यामध्ये आठ रुग्ण मुंबई येथील, तर दोन जण पुणे येथील आहेत. प्रत्येकी एक रुग्ण यवतमाळ आणि कल्याण येथील आहे.

दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) प्रयोगशाळा चाचणीचे निकष बदलले असून, संसर्गाच्या सामूहिक प्रसाराची चाचपणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. 

मुंबईत आढळलेल्या आठ रुग्णांपैकी सहा जणांची परदेश प्रवासाची पार्श्वभूमी आहे, तर एक जण विमानतळावर काम करणारा कर्मचारी असून आणखी एका रुग्णाने गुजरातमध्ये प्रवास केलेला आहे. यवतमाळ येथील असणारा, पण मुंबईतील रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णाने कांगो देशाचा प्रवास केलेला आहे. कल्याण येथील कोरोनाबाधित रुग्ण हा दोन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या आणि दुबई प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या उल्हासनगर येथील तरुणीचा भाऊ आहे. तो स्वतःही बहिणीसोबत दुबईला गेला होता.

पुणे येथील २५ वर्षाच्या बाधित तरुणाने इंग्लंड आणि आयर्लंड येथे प्रवास केलेला आहे. दरम्यान, कुठलाही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेली एक ४१ वर्षाची पुण्यातील महिला कोरोनाबाधित आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. हा रुग्ण बाधित होण्यामागची कारणमीमांसा तिच्या साथरोगशास्त्रीय अन्वेषणानंतर स्पष्ट होईल. 

राज्यातील रुग्णांची संख्या

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्ण असे 
• पिंपरी-चिंचवड - १२ 
• पुणे - ११ 
• मुंबई - १९ 
• नागपूर - ०४ 
• यवतमाळ, कल्याण - प्रत्येकी ०४ 
• नवी मुंबई - ०३ 
• अहमदनगर - ०२ 
• पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी - प्रत्येकी १ 
एकूण ६४ (मुंबईमध्ये एक मृत्यू) 

देशभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ही मंडळी आहेत देखरेखीखाली 

राज्यात परदेशातून आलेल्या एकूण २७५ प्रवाशांना सर्वेक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकूण १८६१ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत १५९२ जणांना भरती करण्यात आले होते. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी १२०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर ६४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT