Manoj Jarange warning on GR amendment

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Dussehra Melava : ''ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ७० हजार अन् संपूर्ण कर्जमुक्ती द्या'' ; जरांगेंची सरकारकडे मोठी मागणी

Manoj Jarange on farmers financial aid : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी द्या, अशीही मागणी केली आहे.

Mayur Ratnaparkhe

Manoj Jarange’s Big Demand to Government : विजयादशमीनिमित्त नारायणगडावर मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी समाजाला संबोधन केले. यावेळी त्यांनी विविध मुद्य्यावंर भाष्य केले. याचबरोबर सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

मनोज जरांगे म्हणाले, मराठवाडा आणि लगतच्या जिल्ह्यात दिवाळीच्या आत ओला दुष्काळ जाहीर करा. नुकसान झालेल्या  शेतकऱ्यांना हेक्टरी ७० हजार रुपये द्या. नदीच्या कडेला असणारी ज्यांची शेती उभ्या पिकांसह वाहून गेली आहेत त्यांना एक लाख ३० हजार रुपये द्या, संपूर्ण कर्जमुक्ती द्या.

याशिवाय मराठवाडा, विदर्भातील, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातील अशा संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांनी मागील २० वर्षांत आत्महत्या केल्या आहेत, त्या कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी सरकारने द्यावी. अशी मागणी जरांगेंनी केली.

याचबरोबर जरांगे पुढे म्हणाले, पुढील मुद्दा आहे शेतीला हमी भाव घ्यायचा त्याच्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही. हमी भाव जर दिला तर कुणाच्याही आत्महत्या होणार नाहीत. फक्त आता शेतकऱ्यांनी थोडं सावध व्हावं.

यानंतरचा मुद्दा आहे शेतीला नोकरीचा दर्जा द्या. जो दहा एकरच्या आत शेती करत असेल, त्याला दहा हजार रुपये महिना सुरू करावा. तसेच कुणीही शेती विकू नये, असे आवाहनही जरांगे यांनी यावेळी केले. शेतकऱ्यांना न्याय देईपर्यंत मागे हटायचं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती; तेवढ्यात काळानं घात केला अन्..., २० वर्षीय लेकीनं जीव गमावला

Pune Thar Donkey Viral Video : पुणेकरांचा नादच खुळा!, चक्क लाखोंची 'THAR' गाढवं समोर बांधून भररस्त्यानं वाजवत, ओढत नेली शोरूमला

Video : हर हर महादेव! कैलाश पर्वत सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालं..सुर्योदयाचा चमत्कारिक व्हिडिओ व्हायरल, दिवसभरात 10 लाख Views

मानधन नाही तर 'या' कारणासाठी शैलेश लोढांनी सोडला तारक मेहता का उल्टा चष्मा; स्वतःच उघड केलं कारण !

Navi Mumbai: नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार! सर्वात वर्दळीच्या 'या' ठिकाणी ब्रिज बांधणार, कधी आणि कुठे ? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT