Accident Sakal
महाराष्ट्र बातम्या

Hingoli Accident : हिंगोली-सेनगाव मार्गावर पिकअप उलटून एक ठार, सहा जण जखमी

हिंगोली-सेनगाव मार्गावर तीन दिवसांत चार जण ठार, तर सहा जण जखमी झाले आहेत.

राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली-सेनगाव मार्गावर रिधोरा पाटीजवळ पिकअप उलटून झालेल्या अपघातात एक जण ठार, तर सहा जण जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.२२) दुपारी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील अंजनी बुद्रुक (ता.मेहकर) येथील काही जण पिकअप व्हॅनने रविवारी दुपारी कार्यक्रमासाठी नर्सी नामदेव येथे येत होते. त्यांचे पीकअप व्हॅन हिंगोली (Hingoli) -सेनगाव मार्गावर रिधोरा पाटीजवळ आले असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटला. या अपघातात एक जण ठार, तर सहा जण जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच नर्सी नामदेव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अरुण नागरे, सेनगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक ठोके, सहायक पोलिस उपनिरीक्षक आर.बी. पोटे, जमादार हेमंत दराडे, जमादार पी.जी. डवले यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातातील मृत योगेश लाड (वय २२) व जखमी असलेले रामदास श्रीरंग बोरोडे ( ४०), नागेश पायघन (१८), लक्ष्मण पारोडकर (२६) , विष्णू टोणवे (२६) , सुरेखा श्रीकृष्ण पायघन (४५) आकाश संतोष लाड (२६) यांना उपचारासाठी उपप्रादेशिक परिवहन (RTO) अधिकारी माने यांच्या वाहनाने तर काही जणांना रुग्णवाहिकाद्वारे तातडीने हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

जखमींपैकी दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी अद्यापपर्यंत नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. दरम्यान हिंगोली-सेनगाव या मार्गावर तीन दिवसांत चार जण ठार, तर सहा जण जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT