Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

कर्तव्यांकडे दुर्लक्ष; बंडखोरांविरोधात जनहित याचिका, कामावर परतण्याची मागणी

बंडखोर आमदारांचा शिंदे गट आणि ठाकरे गट थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.

वैष्णवी कारंजकर

एकनाथ शिंदेंसह शिवसेना नेत्यांच्या बंडाचा आज सातवा दिवस आहे. हे बंड आता केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता सर्वोच्च न्यायालयातही पोहोचलं आहे. दरम्यान, या बंडखोरांविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. (Mumbai High Court PIL filed against rebel Shivsena mlas)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि इतर बंडखोर शिवसेना आमदारांविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये त्यांच्या अधिकृत कर्तव्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आणि त्यांना कार्यालयात पुन्हा कामावर येण्यासाठी निर्देश देण्याची मागणी केली आहे. मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

शिंदे आणि इतरांनी आपल्या कर्तव्याचा निर्वाहन न करण्याचा याचिकेत आरोप करण्यात आला आहे. तर कोर्टाने या सर्वांना कामावर परत येण्यासाठी निर्देश द्यावा अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. उत्पल बाबुराव चंदवार आणि इतर लोकांनी मुंबई हायकोर्टात ही याचिका दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT