PM Crop Insurance Scheme esakal
महाराष्ट्र बातम्या

PM Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! आता एक रुपयात मिळवा पीक विमा; 'या' तारखेपर्यंत असणार मुदत

पीक विमा नोंदणीसाठी शेताचा सातबारा उतारा, ८ अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, पीकपेराचे स्वयंघोषणापत्र, ई-पीक पाहणी इत्यादी कागदपत्रे बंधनकारक आहेत.

सकाळ डिजिटल टीम

एक रुपया विमा हप्त्यामध्ये विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टरी मिळणार आहे.

सातारा : नैसर्गिक आपत्तीसारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान होते. या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी एक रुपयात पंतप्रधान पीक विमा योजना कृषी विभागामार्फत (Agriculture Department) राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सी.एस.सी. केंद्र, महा-ई-सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्र, सर्व राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शेतकरी विमा संरक्षणासाठी वेबपोर्टलद्वारे थेट अर्ज करू शकतील.

त्यासाठी पीक विमा पोर्टलवर www.pmfby.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून दिला आहे. एक रुपया एवढी विमा हप्त्याची रक्कम पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाइन भरावयाची आहे. अर्ज सदर संकेतस्थळावर पूर्ण भरल्यानंतर क्रमांकासह पोचपावती मिळेल, तसेच शेतकऱ्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वर ही एसएमएसद्वारे सूचित केले जाईल.

पीक विमा नोंदणीसाठी शेताचा सातबारा उतारा, ८ अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, पीकपेराचे स्वयंघोषणापत्र, ई-पीक पाहणी इत्यादी कागदपत्रे बंधनकारक आहेत. खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्या क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी न झाल्यास संबंधित विमा क्षेत्र घटक पीक विमाअंतर्गत नुकसान भरपाईस पात्र राहील.

पेरणीनंतर ३० दिवस व काढणीच्या १५ दिवस अगोदर पूर, पावसातील खड्डे, दुष्काळामुळे अपेक्षित उत्पादनात मागील ७ वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाल्यास क्षेत्रातील शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळेल. ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंड्या बांधून सुकवणे जरुरी असते.

त्या पिकाच्या काढणीनंतर दोन आठवड्यांत गारपीट, चक्रीवादळ व त्यामुळे आलेला पाऊस, बिगरमोसमी पावसामुळे पसरून ठेवलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल, तसेच स्थानिक आपत्तीअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास भूस्खलन, गारपीट.

तसेच ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे पिकाचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येणार आहे. स्थानिक आपत्ती व काढणीनंतर पसरवून ठेवलेल्या पिकांच्या नुकसानीच्या बाबतीत सदर पीक नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत संबंधित बँक किंवा विमा कंपनी यांना देणे आवश्यक आहे.

पिकांच्या नुकसानीसाठी मदत

एक रुपया विमा हप्त्यामध्ये विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टरी मिळणार आहे. यामध्ये भात (तांदूळ) ४१ हजार, ज्वारी २० हजार, बाजरी १८ हजार, नाचणी २० हजार, भुईमूग ४० हजार, सोयाबीन ३२ हजार, मूग २५ हजार ८१७, उडीद २६ हजार, कांदा ४६ हजार.

नैसर्गिक आपत्तीसारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान होते. या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी एक रुपयात पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा.

- विजय माईनकर, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT