Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar: पुणे जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा काल (सोमवारी) पार पडली. या सभेत पंतप्रधान मोदींनी ज्येष्ठ नेते शरद पवारांचे नाव न घेता जोरदार टीका केली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशासह राज्याभरात मोदींच्या सभा होत आहेत. पुणे जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा काल (सोमवारी) पार पडली. या सभेत पंतप्रधान मोदींनी ज्येष्ठ नेते शरद पवारांचे नाव न घेता जोरदार टीका केली.

यादरम्यान काल(सोमवारी) पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली यावेळी त्यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. मोदी यांच्या टीकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया देताना मी पुढच्या सभेत भटकती आत्मा कोण हे मी मोदींना विचारेन असं अजित पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर कोणता उद्देश ठेवून ही टीका केली हे देखील मोंदींना विचारेन असं अजित पवार म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?

महाराष्ट्रातील एका अतृप्त आत्म्यानं ४५ वर्षांपूर्वी अस्थिरतेत लोटलं त्यानंतर आता देशही अस्थिरतेत लोटण्याचं काम या व्यक्तीकडून केलं जात आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांची रेसकोर्सच्या मैदानावर सभा पार पडली, या सभेत त्यांनी हे विधान केलं आहे. 

"मी आज जे काही बोलेल ते कोणी व्यक्तीगत आपल्यावर घेऊ नये. काही भटकणाऱ्या आत्मा असतात, ज्यांची इच्छा पूर्ण होत नाहीत त्यांची आत्मा भटकत राहते. ज्याचं स्वतःचं काम होत नाही तर ते दुसऱ्यांचं काम देखील बिघडवायला लागतात. आपला महाराष्ट्र देखील अशाच एका अतृप्त आत्मांचा शिकार झाला आहे. आजपासून ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका मोठ्या नेत्यानं आपल्या महत्वाकांक्षेसाठी या खेळाला सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र एक अस्थिरतेच्या काळात ओढला गेला, त्यानंतर अनेक मुख्यमंत्री आपले कार्यकाळ पूर्ण करु शकले नाहीत.


अजित पवार काय म्हणाले?

ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना अजित पवार म्हणाले, मी काही ज्योतिषी नाही, यासंदर्भात पुढच्या सभेमध्ये मी तिथे असेन तेव्हा पंतप्रधानांना विचारेन की त्या भटकत्या आत्म्याचे नक्की नाव काय आहे. कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे वक्तव्य केलं हे मी त्यांना विचारेन आणि तुम्हाला सांगेन असंही ते पुढे बोलताना म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT