NCP leader Praful Patel addressing the media during a press conference while responding to statements made by MNS chief Raj Thackeray.

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

Praful Patel reply Raj Thackeray Video: ‘’राज ठाकरे, वाकरे माझा काय संबंध? ते….’’ ; प्रफुल्ल पटेल पत्रकार परिषदेतच भडकले!

NCP leader Praful Patel Press : ''अजितदादानंतर काय, कोण, कुठे, कसं? ही प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे.'' असंही पटेलांनी स्पष्ट केलय.

Mayur Ratnaparkhe

Praful Patel Responds to Raj Thackeray’s Statements : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर, महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर आता अजितदादांच्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण असणार, यावरून जोरदार चर्चा सुरू आहेत. शिवाय, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनकरणाचा मुद्द्यावरूनही राजकारण तापलं आहे.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणसाठी अजित पवार तयार होते, असं शरद पवारांसह त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या पक्षाचे नेत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, भुजबळ यांच्याकडून हे नाकारलं जात आहे.

दरम्यान, अजितदादानंतर आता पक्षाध्यक्ष पदासाठी प्रफुल्ल पटेल यांचेही नाव चर्चेत आले होते. ज्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून मोठं विधान केलं होतं. ज्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांनी आज पत्रकारपरिषद घेत, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही, असे स्पष्ट केले. शिवाय, राज ठाकरेंनाही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, ‘’अजितदादानंतर काय, कोण, कुठे, कसं? ही प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. ती मी योग्यरितीने पार पाडत आहे. राज ठाकरे, वाकरे माझा काय संबंध ते माझ्या पक्षाचे व्यक्ती आहेत का? त्यांनी ठरवायचं का माझ्या पक्षाचा विधिमंडळ नेता कोण की, अध्यक्ष कोण?’’

तसेच ‘’आम्ही काय राज ठाकरे किंवा सकाळी ९ वाजताचं जे बुलेटीन आहे वैगेर वैगेरे किंवा कुणी तेलंगनाचं वार आहे हे सगळे लोक येवून, आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षात काय करायचं. आम्ही योग्य निर्णय घेतला आहे पहिला आणि दुसराही योग्य निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहोत.’’ असंही यावेळी पटेल यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते? –

‘’महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही.’’ असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘अँटी ड्रोन सिस्टीम’चा वापर; विनाकारण ड्रोन उडविणाऱ्यांवर होणार पोलिसांची कारवाई

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT