pravin darekar गुगल
महाराष्ट्र बातम्या

पुढील अर्ध्या तासात कारवाई झाली नाहीतर.., पोलखोल प्रकरणावरून दरेकरांचा इशारा

दंडेलशाहीला दंडेलशाहीने उत्तर देऊ, पोलखर आंदोलनावरून प्रवीण दरेकर संतापले

सकाळ डिजिटल टीम

दंडेलशाहीला दंडेलशाहीने उत्तर देऊ, पोलखर आंदोलनावरून प्रवीण दरेकर संतापले

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी भाजपकडून आजपासून पोलखोल अभियान सुरू केलं जात आहे. त्यापूर्वीच भाजपच्या पोलखोल रथाची अज्ञातांनी तोडफोड केली. दगड मारून या रथाच्या काचा फोडण्यात आल्या. ही तोडफोड महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केल्याचा आरोप भाजपचा आहे. आता या घटनेवर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यावर भाजपच्या प्रविण दरेकर यांनी दंडेलशाहीला दंडेलशाहीने उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे. गुंडप्रवृत्ती हाताशी धरून पोल खोल आंदोलन दाबण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याप्रकरणी पुढील अर्ध्या तासात कारवाई झाली नाहीतर पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

यावेळी ते म्हणाले, आज भाजपच्यावतीने मुंबईत पोलखोल अभियान सुरु केलं आहे. त्याचा समारोप सायनला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. कालपासून सुरु झालेल्या या अभियातून मुंबई महापालिकेत होत असलेला घोटाळा उघड करत आहे. लोकशाही पद्धतीने लोकांसमोर हे आम्ही मांडू शकतो. पण काही गुंडप्रवृत्ती हाताशी धरून आमचं पोल खोल आंदोलन दाबण्याचा प्रयत्न सरकारचा असल्याचा आरोप केला आहे. या मागे शिवसेनेचा हात आहे की काय हे पाहण्याची गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आरोपीला पकडलं नाही तर पोलिस स्टेशनला येऊन आंदोलन करणार असून पोल खोल आंदोलनाच्या निमित्ताने कायदा सुव्यवस्था बिघडली तर पूर्णपणे सरकार जबाबदार असेल, असंही ते म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले, लाखो रुपये खर्च करून पोलिस आयुक्त ऑफिसमध्ये आणि गल्लीबोळात सीसीटीव्ही लावले आहेत. या प्रसंगाच्या ठिकाणीही सीसीटीव्ही लावले आहेत. उद्या वरिष्ठांकडून सूचना आल्यास सीसीटीव्ही खराब असल्याचं सांगण्यात येऊ शकतं. असं काही आढळलं तर पोलिस ठाण्यात पोलखोल सभा घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शिवसेनेला त्यांचे घोटाळे बाहेर येतील याची भीती आहे. त्यामुळं सरकार पोलखोल आंदोलनावर बंदीही घालत आहे. त्यामुळं मुंबईच्या पोलिस आयुक्तांना इतकचं सांगणं आहे की, त्यांनी कायदा सुव्यवस्तेवर लक्ष द्यावे. कारण सरकार राजकीय बैठकांमध्ये आणि इफ्तार पार्टींमध्ये व्यस्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Municipal Election 2026 : अमरावतीत 'या' तीन प्रभागात चुरशीची लढत, आमदार राणांसह मुख्यमंत्री फडणवीसांसाठी वर्चस्वाची लढाई

Highway Parking Rule: महत्त्वाची बातमी! महामार्गावरील पार्किंग नियमांमध्ये मोठे बदल; वाहनांसाठी नवीन दर निश्चित

NMMC Election: गणेश नाईक पार्टीविरोधात शिवसेनेची लढाई, जाहीरनामा प्रकाशनावेळी राजकीय आरोप-प्रत्यारोप; नेमकं काय घडलं?

Pimpri News : भारतीय तरुणाला कंबोडियात बनवले ‘सायबर स्लेव्ह’; तब्बल चार महिने खोलीत डांबले

Education News : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एमएचटी-सीईटी, एमबीए-सीईटीला नोंदणी आजपासून सुरू; 'असा' करा अर्ज

SCROLL FOR NEXT