Pravin Darekar Tested Corona Postive
Pravin Darekar Tested Corona Postive sakal media
महाराष्ट्र

नेत्यांमध्ये संसर्ग वाढला... प्रवीण दरेकरांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

ओमकार वाबळे

राज्यातील नेते मंडळींमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. मंत्र्यासोबत आता विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काल रात्री त्यांना ताप होता. यानंतर टेस्ट केली. आणि त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.(Pravin Darekar Tests Corona positive)

याआधी महाविकास आघाडी सरकारमधील 13 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यातील जवळपास 22 आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. भाजपचे खासदार सुजय विखे पाटील हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

कोरोनानंतर (Covid19) आता ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरीअंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निर्बंध लावले जात आहेत. लग्न सोहळे, राजकीय सभा आणि गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या संसर्गामुळे राज्य सरकारने नुकतेच कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र मागच्या काळात झालेल्या राजकीय मंडळींच्या लग्न सोहळ्यांमध्ये अनेकजण कोरोनाबाधित झाले आहेत.

सुरुवातीला आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासोबतच आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याव्यतिरिक्त राज्यातील 22 आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.

कोरोना पॉझिटिव्ह

मंत्री

बाळासाहेब थोरात

वर्षा गायकवाड

यशोमती ठाकूर

के. सी. पाडवी

प्राजक्त तनपुरे

एकनाथ शिंदे

आमदार

राधाकृष्ण विखे-पाटील

सागर मेघे

शेखर निकम

इंद्रनील नाईक

निलय नाईक

माधुरी मिसाळ

चंद्रकात पाटील (मुक्ताईनगर)

मदन येरावार

अतुल भातखळकर

रोहित पवार

धीरज देशमुख

इतर नेते

सुप्रिया सुळे

पंकजा मुंडे

हर्षवर्धन पाटील

अंकिता पाटील-ठाकरे (हर्षवर्धन पाटील यांची मुलगी)

दीपक सावंत

रामकृष्ण ओझा

सुजय विखे पाटील

अरविंद सावंत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT