Protest sakal
महाराष्ट्र बातम्या

Teacher Protest : शिक्षक दिनी काळ्या फिती लावणार; शिक्षकांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

Teacher Protest : आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या, या एकमेव मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मंगळवारी (ता. ५) शिक्षक दिनी काळ्याफिती लावून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकेतील शिक्षकांना अध्यापनाऐवजी अशैक्षणिक कामे देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात येत आहे. (primary teachers association will protest by wearing black ribbon on Teachers Day news)

शिक्षकांना जनगणना, निवडणूक, आपत्तीकाळात मदत एवढी कामे करावीत, असे न्यायालयाचे आणि सरकारचे आदेश असताना राष्ट्रीय कामाच्या नावाखाली अनेक अशैक्षणिक कामे करावी लागतात, अशी शिक्षक संघाची तक्रार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांना मतदार नोंदणी, कुटुंब सर्वेक्षण, विविध प्रकारची ऑनलाइन माहिती भरणे, उपस्थिती भत्त्याच्या नोंदी करणे, ४० हून अधिक नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, लसीकरण मोहीम, जंतूनाशक गोळ्या वाटप व अहवाल देणे, सरकारच्या मोहिमेच्या प्रचारासाठी प्रभातफेरी काढणे, माध्यान्ह भोजनाच्या नोंदी करणे आणि हिशेब ठेवणे, भाजीपाला खरेदी करणे व त्याचा हिशेब ठेवणे, विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन घेणे आदी कामे करावी लागतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याच जोडीला विमा योजनेचा लाभ देणे, वेगवेगळ्या योजना व परीक्षांचे ऑनलाइन अर्ज भरणे, घरोघर जाऊन शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांच्या नोंदी ठेवणे, पोलिस पंचनाम्यात पंच म्हणून उपस्थित राहणे, वृक्षलागवड अहवाल देणे, सरल प्रणालीची माहिती भरणे, युडायस माहिती भरणे, कोकणात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शिक्षकांची नेमणूक, गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची व्यवस्था करणे अशी कामे करावी लागतात. ही कामे न केल्यास कारवाईचा बडगा उगारला जातो, असे शिक्षक संघाचे म्हणणे आहे.

राज्यातील शिक्षकांनी काळ्या फिती लावून निषेध आंदोलनात सहभागी व्हावे, असे राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष एन. वाय. पाटील, प्रदेशाध्यक्ष अंबादास वाजे, सरचिटणीस बाळासाहेब झावरे, आबासाहेब जगताप, कार्याध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

"राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिक्षकांना राष्ट्रीय कामाच्या नावाखाली विविध प्रकारची ७५ अशैक्षणिक कामे करावी लागतात. त्याचा प्रतिकूल परिणाम अध्यापनावर व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्यापन करणे हे काम राष्ट्रीय नाही का? असा प्रश्न तयार होतो." - बाळकृष्ण तांबारे, उपाध्यक्ष, राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT