Prithviraj Chavan
Prithviraj Chavan esakal
महाराष्ट्र

..म्हणून शिंदे गटातील आमदार निलंबनास पात्र ठरतील; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी बंड केल्यामुळं महाराष्ट्रातील राजकारणात मोठा राजकीय पेच निर्माण झालाय.

सातारा : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) यासंदर्भात सुनावणी देखील सुरूय. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं, यावर सर्व अवलंबून आहे. यासंदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आपलं मत व्यक्त केलंय.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यामुळं महाराष्ट्रातील राजकारणात मोठा राजकीय पेच निर्माण झालाय. मूळ शिवसेना (Shiv Sena) कोणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? शिंदे गटानं पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केलं का? असे प्रश्न सामान्य नागरिकांना पडले आहेत. यावर पृथ्वीराज चव्हाणांनी थेट मत व्यक्त केलं. शिंदे गटाकडून पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालं असून शिंदे गटातील आमदार निलंबनास पात्र आहेत, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

शिंदे गटाच्या विलीनीकरणाबाबत स्पष्टीकरण देताना चव्हाणांनी सांगितलं की, किमान दोन तृतीयांश सदस्यांनी कुठल्यातरी पक्षात विलीन झालं पाहिजे, अशी राज्यघटनेत तरतूद आहे. पण, असं झालेलं नाही. त्यानंतर आता त्यांना विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही, असा तर्क दिला जात आहे. मात्र, आता ही घटना घडून गेलीय. अध्यक्षांनी ज्या नेत्याला गटनेता म्हणून मान्यता दिली आहे किंवा प्रतोद म्हणून मान्यता दिलीय. त्यांचा आदेश मोडलेला आहे. त्यामुळे व्हीप मोडला आहे, त्यात काही शंका नाही. राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टाप्रमाणे पक्षांतर बंदी कायद्यात जी तरतूद करण्यात आलीय, त्याचं उल्लंघन झालं आहे. त्यामुळं शिंदे गटातील आमदार निलंबनाला पात्र आहेत, असं विधान चव्हाण यांनी केलंय. आता सर्वोच्च न्यायालय कोणता निर्णय देतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 Play Off : प्ले ऑफसाठी कोणाला किती संधी; हैदराबादची 87, चेन्नईची 72 टक्के शक्यता; तर आरसीबी...

Slovakia Prime Minister : स्लोवाकियाच्या पंतप्रधानांवर झाडल्या गोळ्या; जखमी अवस्थेत रुग्णालयात केलं दाखल

Pune News : धोकादायक होर्डिंग सात दिवसात काढून टाका; आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश

Neeraj Chopra: मायदेशातील स्पर्धेतही नीरजचा डंका! तीन वर्षांनी पुनरागमन करत फेडरेशन कपमध्ये जिंकले सुवर्णपदक

Latest Marathi News Live Update : जुने रेकॉर्ड मोडणार, चारशेपार येणार- नरेंद्र मोदी

SCROLL FOR NEXT