Rahul Gandhi On IUM esakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Gandhi On IUM : राहुल गांधींनी धर्मनिरपेक्ष म्हटलेली केरळची मुस्लिम लीग जिनांच्या मुस्लिम लीगपेक्षा किती वेगळी?

मुस्लीम लीग हे नाव ऐकताच पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा पक्ष आठवतो.

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi On IUM : मुस्लीम लीग हे नाव ऐकताच पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा पक्ष आठवतो. ज्या पक्षाच्या मागणीवरून भारताचे दोन तुकडे झाले. पण अमेरिकेत पोहोचल्यावर राहुल गांधींनी आपल्या भाषणात ज्या मुस्लीम लीगचा उल्लेख केलाय ती या जीनांच्या लीग पेक्षा वेगळी आहे.

या संघटनेच नाव आहे इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML). हा पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने जोरदार टीका केली आहे. देशातील फाळणीला मुस्लीम लीग जबाबदार असल्याचे भाजप नेते अमित मालवीय यांचे म्हणणे आहे पण राहुल गांधी हे धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे सांगतात. वायनाडमध्ये तुमची स्वीकारार्हता वाढवण्यासाठी तुम्ही हे करताय का? पण राजकीय वक्तव्य सोडली तर दक्षिणेतील इंडियन युनियन मुस्लिम लीग जीनांच्या मुस्लिम लीगपेक्षा किती वेगळी आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

IMUL चा इतिहास

मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये ढाका येथे झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच ही संघटना शांत बसली. यानंतर पाकिस्तानमध्ये मुस्लिम लीग आणि बांगलादेशमध्ये ऑल इंडिया अवामी मुस्लिम लीगची स्थापना झाली. आणि भारतात 10 मे 1948 रोजी इंडियन युनियन मुस्लिम लीग अस्तित्वात आली. त्याची सुरुवात एक राजकीय पक्ष म्हणून झाली. पण बांगलादेश आणि पाकिस्तानच्या मुस्लिम लीगच्या तुलनेत भारताच्या आययूएमएलचा इतिहास खूप वेगळा आहे.

त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आणि या पक्षाने केरळमध्ये सरकारही स्थापन केले. IUML ने निवडणूक लढवली आणि लोकसभेत आपली उपस्थिती नोंदवली. IUML हा केरळमधील प्रसिद्ध राजकीय पक्ष आहे आणि त्याला प्रादेशिक पक्षाचा दर्जा आहे. केरळच्या अनेक भागात या पक्षाचा खोलवर प्रभाव आहे.

IMUL धर्मनिरपेक्ष आहे?

बीबीसीच्या बातमी नुसार, आययूएमएल हा फक्त मुस्लिमांचा पक्ष आहे. यामध्ये इतर धर्माच्या लोकांचाही सहभाग आहे. केरळचे डी रघुनाथ पानवेली म्हणतात की, पूर्वी मलाही मुस्लिम लीग मुस्लिमांचा पक्ष वाटायचा पण तसं नाहीये. जेव्हा मला याची माहिती मिळाली तेव्हा मला कळले की हा पक्ष फक्त मुस्लिमच नाही तर दलित, मागास आणि आदिवासी समाजाचे लोकही यात आहेत. 12 वर्षांपूर्वी या पक्षात सामील झालेले पानवेली सांगतात की, या पक्षामुळे मी कधीही निराश झालो नाही.

केरळचे माजी सार्वजनिक कल्याण मंत्री व्ही के इब्राहिम कुंजू म्हणतात की IUML हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. पक्षाचा इतिहास 40 वर्षांहून अधिक जुना आहे. आययूएमएलनेही काँग्रेससोबत सरकार स्थापन केले आहे. सबना सांगतात, हा केवळ मुस्लिमच नाही, तर अनेक धर्मांचा पक्ष आहे. आम्ही केवळ धर्माच्या नावावर मतदान करत नाही.

शाहजहान म्हणतात की, IUML ही अशी साखळी आहे ज्यामध्ये हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन सर्व एकत्र येतात. दुसरीकडे, डेड्डी देवी म्हणतात, देशाच्या राजकारणात आणि केरळच्या राजकारणात खूप फरक आहे. प्रत्येकाला इथे एकत्र राहायला आवडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shalinitai Patil Passes Away: माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं मुंबईत राहत्या घरी निधन

BMC Election: मुंबईतील भाजपचा 'हा' अभेद्य किल्ला ठाकरे बंधू जिंकणार का? मारवाडी, गुजराती आणि जैन मतदारांच्या हाती निर्णय

IND vs SA. 5th T20I: भारताने जिंकली मालिका! आधी हार्दिक-तिलकने चोपलं अन् मग चक्रवर्तीने फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेला अडकवलं

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या, एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT