Raj Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : "तेव्हा वेदना होत होत्या, तो पक्ष मी जगलो..." शिवसेना फुटीवर राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

सकाळ डिजिटल टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भव्य सभा शिवतीर्थ येथे पार पडली. शिवसेना फुटीवर भाष्य केले. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गेल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे.  

राजकारणाचा खेळ झाला आहे. हे सर्व पाहताना मला वाईट वाटलं. शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचं. हे तुझं का माझं हे चालू होत. तेव्हा वेदना होत होत्या तो पक्ष मी जगलो आहो, असे राज ठाकरे म्हणाले.


राज ठाकरे म्हणाले, इतकी वर्षे मी शिवसेना पाहिली. ती शिवसेना मी जगलो होतो. अनेकांच्या घामातून, रक्तातून शिवसेना उभी राहिली होती. 

राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला आहे. धनुष्यबाण बाळासाहेबांशिवाय कोणाला झेपणार नाही. एकाला झेपलं नाही दुसऱ्यांला झेपेल की नाही माहीत नाही, असे म्हणत राज ठाकरे म्हणाले.

माननीय बाळासाहेब असते तर गेल्या अडीच वर्षांत जे घडलं ते घडलंच नसतं. २०१९ चाय विधानसभेला शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली, लोकांनी ह्यांच्या युतीला सत्तेत येण्यासाठी मतदान केलं.आणि अचानक उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मागितलं, असे राज ठाकरे म्हणाले.

राजकारणाचा सगळा जो चिखल करून ठेवला आहे त्यावर माझं तर मत आहे एकदा निवडणूका घ्या आणि जनतेला ठरवू द्या. ज्यांच्या तोंडात शेण घालायचं आहे त्यांच्या तोंडात जनता शेण घालेल, ज्याला सत्तेत बसवायचं त्याला बसवेल, असे आव्हान राज ठाकरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT