Chitra wagh esakal
महाराष्ट्र बातम्या

रत्नागिरी लैंगिक अत्याचार प्रकरण; चित्रा वाघ म्हणाल्या, पोलिस फक्त...

विरोधकांवर कारवाई करण्याची पोलिसांची जनतेत प्रतिमा

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरी (Ratnagiri) शहरातील एका मैदानावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तीन संशयित तरुणांना पोलिसांनी (Police) अटक केली आहे. तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, नादान खंडणीखोर राज्यकर्त्यांमुळे पोलिस हे फक्त खंडणी वसूल करणारे आणि विरोधकांवर कारवाई करणारे अशी प्रतिमा जनतेत तयार झाली आहे. पोलिसांची भीतीच राज्यातून संपलीये असा घणाघात भाजपाच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करत निशाणा साधला.

राज्यसरकार मंत्र्यांपासून पदाधिकाऱ्यांपर्यंत बलात्काऱ्यांना पाठीशी घालतयं.

चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. त्या म्हणाल्या, राज्यसरकार मंत्र्यांपासून पदाधिकाऱ्यांपर्यंत बलात्काऱ्यांना पाठीशी घालतयं. महिलांना अत्याचारा विरोधात न्याय मिळण्यासाठी अनेक अभिनंदनीय तरतुदी असलेले शक्ती विधेयक विधिमंडळाने एकमताने संमत केले आहे. त्याबद्दल ठाकरे सरकारला धन्यवाद. मात्र हे सरकार बलात्काऱ्यांना पाठीशी घालतयं असा आरोपही त्यांनी केला.

नेमके काय घडले

शिमगोत्सवाचा ज्वर सुरु असताना अल्पवयीन मुलगी होळी पाहण्यासाठी बाहेर पडली होती. रात्री रस्त्याने जाणाऱ्या या मुलीचा गैरफायदा घेऊन यातील एका संशयिताने तिला दुचाकीवर बसवून शहरालगत ग्रामीण भागाच्या जंगलमय भाग असलेल्या सड्यावर नेले. त्यावेळी त्या संशयिताचे मित्रही त्या स्थळी दाखल झाले. त्या अल्पवयीन मुलीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केला. भर रात्रीत सड्यावर घडलेला प्रकार स्थानिकांच्या लक्षात आला. स्थानिकांनी शहर पोलिसात खबर दिली. तत्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तत्काळ संशयितांना ताब्यात घेतले. न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावरून चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT