Ready Reckoner rates were same till as May 31 2020 
महाराष्ट्र बातम्या

रेडी रेकनरचे दर 31 मे पर्यंत जैसे थे

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारकडून दर वर्षी एक एप्रिल रोजी रेडीरेकनरचे दर अर्थात वार्षिक बाजार मूल्य दर नव्याने जाहीर केले जातात. मात्र गेल्या वीस दिवसापासून महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी करोनाच्या संकटातून जनतेला सावरण्यासाठी झटत आहेत. यापार्श्‍वभूमीवर 2020-21 या आर्थिक वर्षाचे रेडी रेकनरचे दर दि. 1 एप्रिल 2020 ते दि.31 मे 2020 पर्यंत जैसे थे ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याविषयीचे आदेश नोंदणी महानिरिक्षक ओमप्रकाश देशमुख यांनी जारी केले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
राज्यात दरवर्षी एक एप्रिलला रेडी रेकनरचे अर्थात जमिनी, सदनिका, दुकाने आदींचे वार्षिक बाजारमूल्य दर लागू होतात. रेडी रेकनरचे नवे दर लागू करण्यासाठी तसेच नवे दर काय असावेत, यासाठीचा प्रस्ताव जिल्हानिहाय नोंदणी व मुद्रांक विभागाकडे दाखल झालेला आहे. नोंदणी महानिरिक्षक हा अहवाल मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठवितात. यावर अंतिम निर्णय शासनाकडून देण्यात येतो. त्यानंतर रेडी रेकनरचे नवे दर नोंदणी व मुद्रांक विभाग जाहीर करतात. मागील दोन वर्षांपासून रेडी रेकनरचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहे. दोन वर्षात रेडी रेकनरमध्ये कोणतीही वाढ शासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाची बाजारातील सद्यस्थिती पाहता रेडी रेकनरमध्ये वाढ करू नये, अशी मागणी यापूर्वी विविध संघटनेने शासनाकडे केली आहे.

जगातील पहिली घटना; अमेरिकेत कोरोनामुळे लहान बाळाचा मृत्यू
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसूल यंत्रणा कार्यरत आहे. त्याचबरोबर गर्दी टाळण्यासाठी दस्त नोंदणीची सर्व दुय्यम निबंधक कार्यालये यापूर्वीच बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जमिन, सदनिका, दुकाने आदींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद आहेत. यापूर्वीच 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. यापार्श्‍वभूमीवर या आर्थिक वर्षाचे रेडीरेकनर दर 31 मार्चला जाहीर होणार नसून करोनाच्या संकटातून महाराष्ट्र मुक्त झाल्यानंतर हे दर जाहीर केले जातील, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मागील आठवड्यात स्पष्ट केले होते. त्यानुसार महसूल विभागाकडून दोन महिन्यांसाठी रेडी रेकनर जैसे थे ठेवण्याच्या सूचना नोंदणी विभागाला दिल्या. सोमवारी राज्य शासनाकडून याविषयीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर नोंदणी विभागाकडून रेडी रेकनरबाबतचे परिपत्रक काढले आहे.

जगभरातील मृतांची संख्या वाढली; युरोपमध्ये सर्वाधिक 21 हजार मृत्यू
यंदा रेडी रेकनरचे दर लागू करण्यासंदर्भात नोंदणी विभागाने राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागविले होते. त्यावर राज्य शासनाने रेडी रेकनर अर्थात वार्षिक बाजारमूल्य दर 1 एप्रिल ते 31 मे 2020 पर्यंत अथवा शासनाचे पुढील आदेशापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत रेडी रेकनर जैसे थे म्हणजे मागील वर्षाचेच ठेवावे, असे नोंदणी विभागाला कळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT