Gunratna Sadavarte
Gunratna Sadavarte esakal
महाराष्ट्र

"परबांच्या जागी सामान्य शिवसैनिक बसवा, तात्काळ विलिनिकरण होईल"

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याजागी सामान्य शिवसैनिकाला बसवा, लगेच एसटीचं विलिनिकरण होईल, असं आवाहन अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratn Sadavarte) यांनी मुख्यंमत्र्यांना केलं आहे. सदावर्ते हे आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचं (ST Employee) प्रतिनिधीत्व करत आहेत. जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर (Aazad Maidan) आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी आज तिथून हटवल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. (Replace Anil Parban with ordinary Shiv Sainik ST will be merged immediately says Gunratn Sadavarte)

सदावर्ते म्हणाले, "सकाळी ५ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आम्ही आझाद मैदानात जाऊन आंदोलनाला बसणार आहोत. सरकारनं कोणतेही फंडे वापरले तरी आंदोलन सुरुच राहिल, त्यामुळं राज्यात एकही एसटी गाडी निघणार नाही. माझं उद्धव ठाकरेंना आवाहन आहे की, अनिल परब यांच्या जागी सामान्य शिवसैनिक बसवा बरोबर विलीनीकरण होईल"

दरम्यान, येत्या 3 तारखेला शरद पवार एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याबाबत बोलतील, पण आम्हाला विलिनिकरणचं हवं आहे. आम्ही आझाद मैदानात बसलो नाही तरी आम्हाला पावसात भिजून मत मागायची नाहीत. आमचा हा दुखवटा विलिनीकरणाची मागणी पूर्ण होईपर्यंत सुरुच राहणार आहे, असंही अॅड. सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

आझाद मैदानातून आंदोलकांना बाहेर काढलं

राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं निर्बंध वाढवले आहेत. सध्या नव्या नियमावलीनुसार, शुक्रवार ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून संध्याकाळी ५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मुंबईत जमावबंदीचं १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. त्यामुळं आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना मैदान सोडण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. आंदोलकही पोलिसांच्या या सूचनांचे पालन करत आंदोलनस्थळावरुन बाहेर पडले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT