Resume Esakal
महाराष्ट्र बातम्या

Resume by AI: नोकरी मिळवण्यासाठी AIच्या मदतीनं बनवा आकर्षक रेझ्युम; कौशल्य विकास मंत्रालयाचा उपक्रम

दर्जेदार रेझ्युमच्या अभावामुळे पहिल्या पायरीवरच अपयशाचा सामना करावा लागतो.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : नोकरी मिळवण्यासाठी आता AI अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर तुम्हाला करता येणार आहे. एआयच्या मदतीनं दर्जेदार आणि आकर्षक रेझ्युमे बनवण्यासाठी खास उपक्रम कौशल्य विकास मंत्रालयानं सुरु केला आहे.

याद्वारे होतकरु तरुणांना डिजिटल रेझ्युमे बनवून मिळणार आहे. राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. (Resume by AI to get a job an initiative of Ministry of Skill Development Maharashtra)

सॅपीओ अनालिस्टिक्सच्या सहकार्यातून हा उपक्रम कौशल्य विकास विभागाकडून राबवण्यात येत आहे. या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून २८० रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील युवक अशा मेळाव्यांमध्ये सहभागी होऊन भरती प्रक्रीयेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतात. (Marathi Tajya Batmya)

परंतू अनेकांकडे चांगला रेझ्युमे नसल्यामुळं त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी युवकांना कृत्रिम बुध्दीमत्तेच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे रिझ्युमे तयार करून देण्यात येणार आहे. त्यासाठी देण्यात आलेल्या 86558 26684 या व्हॉट्सअप क्रमांकवर Hi असा मेसेज पाठवण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. (Latest Marathi News)

या उपक्रमामुळे एक लाखाहून अधिक युवकांना ही सेवा मिळू शकणार आहे. या रिझ्युमच्या सहाय्याने त्यांना चांगली नोकरीची संधी मिळू राज्याच्या आर्थिक विकासामध्ये त्यांचा महत्वपूर्ण हात भार लागणार आहे, असं याबाबत माहिती देताना मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे.

तर निवड प्रक्रियेमध्ये प्रतिभावान उमेदवाराचा शोध घेण्यासाठी तसेच तरुणांच्या कौशल्यांची ओळख करून देण्यासाठी रेझ्युम हा अत्यंत उपयुक्त माध्यम असते. या नव्या उपक्रमामुळे भरती प्रक्रीया सुलभ होणार असून त्याचा फायदा उमेदवार आणि कंपन्या अशा दोघांनाही होणार आहे, असं सेक्योर्ड डेब्ट संस्थेचे संस्थापक गगन कुमार यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal No 1 : नव्या वर्षात डिजिटल पत्रकारितेचा नेतृत्वाचा मुकुट पुन्हा ई-सकाळकडे, कॉमस्कोअरमध्ये पटकावले अव्वल स्थान

Retirement Plan : आता रिटायरमेंटनंतर पैशांची चिंता नाही! या 5 योजनांत गुंतवणूक करा; तिजोरी भरलेलीच राहील, दरमहा मिळेल मोठी पेन्शन

Tilak Varma Injury: तिलक वर्माला पोटातील तीव्र वेदनेमुळे अचानक करावी लागली सर्जरी! त्याला झालेला अजार नेमका आहे तरी काय?

Mangal Gochar 2026: 18 वर्षांनंतर कुंभ राशीत मंगल गोचर! अग्नि-वायु एकत्र येऊन तयार होतोय अंगारक योग, वृषभसह 'या' 5 राशींच आयुष्य होईल अगदी कठीण!

Latest Maharashtra News Updates Live: आष्टापुरात बिबट्याने तीन बकऱ्यांचा घेतला जीव

SCROLL FOR NEXT