Sadabhau Khot,Uddhav Thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्य शासनावर सदाभाऊ खोत यांचा निशाणा; म्हणाले,ग्लास भरून ठेवायचा...

समाजाला दुभळ करायचे काम सरकार करत आहे; सदाभाऊ खोत

सकाळ डिजिटल टीम

सांगली: दारू वरील कर कमी करून ग्लास सुरू ठेवायचा आणि क्लास बंद करायचा असे धोरण राज्य सरकारचे आहे. एका पिढीशी, त्याच्या जीवाशी हे सरकार खेळत आहे अशी टिका ठाकरे सरकारवर (Uddhav Thackeray) सदाभाऊ खोत यांनी केली. इस्लामपूरमध्ये माध्यमांशी त्यांनी आज (ता.९) संवाद साधला. राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने काल नियमावली जाहीर केली. यामध्ये शाळा, काॅलेज आॅनलाईन करावे असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी निशाना साधला आहे.

ते म्हणाले, राज्य सरकार दारू वरील कर कमी करायला तत्परता दाखवत आहे. दारूची दुकान सुरू ठेवत आहेत आणि शाळा मात्र बंद करत आहेत. ग्लास सुरू ठेवायचा आणि क्लास बंद करायचा असे धोरण या राज्यात या सरकार कडून अवलंबले जात आहे. यातून शिकणारी नवी पिढी आणि त्यांचे शैक्षणिक प्रचंड नुकसान हे सरकार करीत आहे.

कोरोनाच्या या महामारीत महाराष्ट्रामध्ये मुलाचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. राज्य सरकारने खबरदारी आणि नियमावली घालून राज्यातील शाळा कशा चालू राहतील याकडे लक्ष देणे गरजेचे होते. ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणाने विध्यार्थीच्यामध्ये मोठा खंड पडला आहे. एक पिढी या राज्यांमध्ये शिक्षणापासून वंचित राहते की काय अशी भिती निर्माण झाली आहे.

राज्य सरकारने मुलांचे लसीकरण करून कोरोनाला कसे रोखता येईल हे पाहून शाळा चालू कराव्यात,अशी मागणाही सदाभाऊंनी केली आहे. एकंदरीत त्यांच्या या कारभारात या सरकारला सर्व समाजाला दुभळ करायचे आहे.असेही खोत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा!

आरोग्यासाठी खजूर ठरतोय 'नॅचरल सुपरफूड'! पण किती अन् कधी खावे जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : संस्थानासाठी ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावला येणार

Odisha Elephant: ओडिशात १८ महिन्यांत ११४ हत्तींचा मृत्यू; सरकारची विधानसभेत माहिती, संरक्षणाचे प्रयत्न, काय आहेत कारणे?

Pune News: वनविभागाच्या जमिनींची पडताळणी सुरू! पुणे जिल्ह्यात ‘एसआयटी’मार्फत तपासणी; सरकारला सादर करणार अहवाल, नेमंक काय कारण?

SCROLL FOR NEXT