Sambhajiraje News
Sambhajiraje News Sakal
महाराष्ट्र

शिवसेनेची ऑफर स्विकारली? संभाजीराजेंची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया

वैष्णवी कारंजकर

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेना या जागेवर आपलाच उमेदवार देणार या मुद्द्यावर ठाम आहे. तर त्यांनी संभाजीराजे छत्रपतींना शिवसेना पक्षप्रवेशाची अट घातली आहे. संभाजीराजेंनी ही ऑफर प्रत्यक्षपणे स्विकारलेली नसली, तरी त्याबद्दची सूचक प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली आहे. (Sambhajiraje Chhatrapati Rajyasabha seat)

संभाजीराजेंनी शिवसेनेच्या प्रस्तावाकडे पाठ फिरवल्यानंतर शिवसेनेने कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या नावाचा विचार करण्यास सुरुवात केली आहे. संभाजीराजेंवर दबाव टाकण्यात येत असल्याचं त्यामुळे बोललं जात आहे. दरम्यान, आपण हा प्रस्ताव स्विकारणार की नाही, शिवसेनेबद्दल काय निर्णय घेणार, या सगळ्यासंदर्भात संभाजीराजेंनी मोजक्या शब्दांत उत्तर दिलं आहे. माध्यमांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले, माझी मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा झाली. त्याप्रमाणे पुढे काय करायचं ते ठरलंय. मला विश्वास आहे, जे ठरलं आहे, त्याप्रमाणेच मुख्यमंत्री कृती करतील. ते निश्चितच छत्रपती घराण्याचा सन्मान करतील.

दरम्यान, शिवसेनेकडून या जागेसाठी कोल्हापुरातल्या दुसऱ्या नेत्याच्या नावाची चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचं नाव पुढं येत आहे. त्यामुळे संभाजीराजेंवर दबाव टाकण्यात येत असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे. तर कालपासून कोल्हापूर मुक्कामी असलेले संभाजीराजे तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT