Sambhajiraje News Sakal
महाराष्ट्र बातम्या

कोणापुढे झुकून खासदारकी घेणार नाही; संभाजीराजेंची 'स्वाभिमाना'ने माघार

आपली उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली होती, मी कागदपत्रं घ्यायला गेलो होतो, असंही संभाजीराजे म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

संभाजीराजे छत्रपती यांच्या खासदारकीचा तिढा अखेर सुटला असंच म्हणावं लागेल. शिवसेनेने दिलेली ऑफर नाकारल्यानंतर संभाजीराजे यांनी आपण खासदारकीच्या निवडणुकीला सामोरं जाणार नसल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे मंत्री, नेत्यांबद्दल खुलासे केले आहेत. सुरुवातीलाच संभाजीराजेंनी महाराष्ट्रातल्या जनतेचेही आभार मानले आहे.

राज्यसभा निवडणुकीबद्दलची भूमिका स्पष्ट करताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मी जे बोलणार आहे ते बोलायची माझी इच्छा नाही, माझ्या रक्तात, तत्वात ते नाही. पण मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, आपण कोणतंही शिवाजी महाराजांचं स्मारक, पुतळा असेल तिथे दोघांनी जायचं, दोघांनी स्मरण करायचं आणि संभाजी खोटं बोलत असेल तर सांगायचं. मुंबईत आल्यावर दोन खासदार मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे पाठवले, आमची बैठक झाली, दोघांनीही सांगितलं की शिवसेनेत प्रवेश करा आम्ही उमेदवारी जाहीर करतो. मी स्पष्ट सांगितलं मी प्रवेश करणार नाही. (Sambhajiraje Chhatrapati backed off from Rajyasabha election)

पुढे संभाजीराजे म्हणाले," त्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी मला फोन करत निमंत्रित केलं आपण वर्षावर या चर्चा करू.मीही मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर भेटायला गेलो. तिथे तीन मुद्द्यांवर चर्चा झाली. तिथे त्यांनी पहिला मुद्दा मांडला की आम्हाला छत्रपती सोबत हवे आहेत. म्हणून आम्ही पहिला प्रस्ताव सोबत ठेवतो की तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा. पण या मुद्द्याला मी नकार दिला. मग मी म्हणालो की शिवसेनेची सीट आहे असं ते म्हणतात, त्यांच्याकडे कोटा नाहीये तरीही ते असं म्हणतायत, मग मी प्रस्ताव ठेवला की मला महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार घोषित करा.

"तर त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ते शक्य नाही पण मविआच्या वतीने शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार आम्ही तुम्हाला करायला तयार आहे. तरी मी मान्य केलं नाही. म्हटलं दोघे दोन दिवस विचार करू पुन्हा भेटू. दोन दिवसानी शिवसेनेच्या मंत्र्यांचा फोन आला की आम्हाला उमेदवारी द्यायची. त्यानंतर उमेदवारीचा ड्राफ्ट तयार झाला - मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना आणि मी दिलेल्या सूचना या दोन्हीचा विचार करून मधला मार्ग काढला. आजही माझ्याकडे तो ड्राफ्ट आहे, मंत्र्यांचं हस्तलिखित, त्यांच्याकडे सगळे मेसेज माझ्याकडे आहेत".

संभाजीराजेंनी त्या दिवशीचा सगळा घटनाक्रम सांगितला. राजे पुढे म्हणाले,"सगळं शिष्टमंडळ आलं, एक स्नेही होते, खासदार होते. त्या स्नेह्यांनी मला सांगितलं की आजही मुख्यमंत्र्यांना वाटतं की शिवसेनेत या, मी म्हटलं तसं असेल तर मला पुढं जायचंच नाही. तेव्हा मंत्र्यांनी सांगितलं की पुन्हा एकदा ड्राफ्ट वाचू. त्यात एक शब्द होता. तो जो शब्द होता, जो बदलला, मला तो सांगायचा नाही. त्यानंतर ड्राफ्टही फायनल झाला, मग मी कोल्हापूरला गेलो, पोचल्यावर मला बातमी कळली की संजय पवार जो माझाच कार्यकर्ता आहे, त्याला उमेदवारी मिळालीये. मी मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना फोन केला, कोणी काहीच बोललं नाही. मुख्यमंत्र्यांनी माझा शब्द मोडला, त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण मी आता स्वराज्य बांधण्यासाठी सज्ज झालोय. मी मोकळा झालोय विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी."

मी छत्रपती आहे, मी माझं काम पाहून मला पाठिंबा द्या अशी विनंती करत होतो. पण मी कोणापुढे झुकून, कोणापुढे वाकून खासदारकी घेणार नाही. ही माझी माघार नाही, हा माझा स्वाभिमान आहे, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले आणि आपण राज्यसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली. या निवडणुकीत घोडेबाजाराची शक्यता आहे. तो होऊ नये यासाठी आपण ही निवडणूक लढवत नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NASA: पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतंय 'ब्रह्मास्र'! विनाश वाचवण्यासाठी 'नासा' करतंय ३० हजार कोटींचा खर्च, इतिहासातली पहिलीच घटना

Heritage Tourism: जुन्या वाड्यांना मिळणार पर्यटनाचा नवा चेहरा! सरकार देणार ४० कोटींपर्यंत अनुदान आणि करसवलतींचा लाभ, काय आहे योजना ?

Latest Marathi News Live Update : राष्ट्रीय महामार्गाला ओढ्याचं स्वरुप, अभियंत्याचा मृत्यू

Ulhasnagar: महिला दिनाच्या ३ तासाच्या कार्यक्रमाला २२ लाख खर्च, ५० जणांना फेट्यासाठी ७५ हजार, तर नाश्ता अन् जेवणाचे १० लाख

तामिळनाडूत पक्षफुटीचे लोण! मुख्यमंत्री विजय यांचा AIDMKला धक्का, सहाव्या आमदाराचा राजीनामा; TVKमध्ये प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT