Sanjay Raut on BJP e sakal
महाराष्ट्र बातम्या

बाळासाहेब ठाकरेंचे भक्त पाठीत खंजीर खुपसत नाहीत, राऊतांचा टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेवर जनतेचा विश्वास - राऊत

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेवर जनतेचा विश्वास - राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेवर जनतेचा विश्वास आहे. बाळासाहेब ठाकरेंचे भक्त आहोत असं सांगून पाठीत खंजीर खुपसला आहे. (maharashtra politics) बाळासाहेबांच भक्त असं खंजीर खुपसायचं काम करत नाहीत. बंडखोरी नेमकी कुठे होणार हे लवकरच कळेल, असं सूचक वक्तव्य हे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. आज ते मुंबईत बोलत होते.

यावेळी राऊतांनी बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, बंडखोरांमध्येही बंडखोरी होऊ शकते. हिंंम्मत असेल तर एकनाथ शिंदेंसह असणाऱ्या आमदारांनी राजीनामे द्यावे आणि निवडणुकीला सामोरं जावं, अस आव्हान राऊतांनी केलं आहे. बंडखोर आमदारांनी आपापल्या मतदार संघात निवडून येऊन दाखवावं असंही ते म्हणाले आहेत.

बाळासाहेबांचे भक्त आहोत असं म्हणत शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. बाळासाहेब ठाकरेंचे भक्त पाठीत खंजीर खुपसत नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवाव. लवकरच तुम्हाला कळेल की नक्की बंडखोरी नक्की कुठे होणार आहे. कारण बंडखोरातही बंडखोरी होऊ शकते, असं सूचक वक्तव्यही राऊतांनी केल आहे. तुम्ही पक्ष सोडून गेला आहात त्यामुळे तुम्ही शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर निवडूका घेऊ शकत नाही, हिम्मत असेल तर तुमच्या बापाच्या नावावर निवडणुका घेऊन दाखवा, असंही त्यांनी सुवावलं आहे.

पुढे ते म्हणाले की, अडीच वर्ष मलाईदार खाती होती तेव्हा अन्याय आठवला नाही का? या बंडखोरांचे बाप अनेक आहेत पण आमचा बाप एकच आहे बाळासाहेब ठाकरे. महाविकास आघाडी सरकार हे पडणार नाही याची आम्हाला शाश्वती आहे. त्यामुळे बंडखोर आमदार मुंबईत येण्याचे धाडस करत नाहीयेत. जर का एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचे आहे तर भाजपाने सांगावे, आम्हालाही शिवसैनिक मुख्यमंत्री होतो याचा आनंद होईल. मात्र २०१९ ला भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनीच शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले नव्हते, आजही ते करु ईच्छित नाहीत. त्यांचा डाव मराठी माणूस आणि शिवसेना संपवायचा आहे, असा आरोपही राऊतांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT