महाराष्ट्र

सेनगाव : राष्ट्रवादी, सेना, भाजपचा प्रत्येकी ५ जागी विजय

विठ्ठल देशमुख

सेनगाव : नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी समिश्र कौल दिला आहे. यामध्ये राष्ट्रवादी (ncp) पाच, शिवसेना (shivsena) पाच, भाजपा (bjp) पाच तर काँग्रेस (congress) दोन जागेवर विजय मिळवला. प्रभाग पाचमध्ये राष्ट्रवादीने गड राखला आहे. शहरातील विविध प्रभागात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

प्रभाग पाचमध्ये राष्ट्रवादीने राखला गड; कही खुशी कही गम

सेनगाव नगरपंचायत निवडणुकीकडे शहरासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. या ठिकाणी मागच्या पाच वर्षात भाजपाने राष्ट्रवादी व सेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत पहायला मिळाली होती. यावेळी मात्र मतदारांनी भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादीला समिश्र कौल दिला आहे. तर काँग्रेसला दोन जागेवर विजय मिळवता आला. प्रभाग पाच मध्ये राष्ट्रवादी आपला गड राखण्यात यश मिळाले. विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग एक मधून राष्ट्रवादीच्या गायत्री देशमुख १४७ मते, शिवसेनेच्या योगिता सोमाणी १२४ मते, भाजपाच्या अरुणा गट्टाणी ११० मते तर नोला ५ मते मिळाली, प्रभाग दोनमध्ये शिवसेनेच्या यमुनाबाई देशमुख यांना २०१ मते, भाजपाच्या अनिता खाडे १४३ मते तर नोटाला २ मते मिळाली.

प्रभाग तीनमध्ये भाजपाचे अमोल तिडके यांना २१७ मते, शिवसेनेच्या रेखाबाई देशमुख १९४ मते, काँग्रेसचे आंबादास तिडके २ मते, अपक्ष गजानन देशमुख ९ मते तर नोटाला ५ मते मिळाली. प्रभाग चारमध्ये भाजपाच्या अंजली देशमुख यांना १२७ मते, शिवसेनेचे जगन्नाथ देशमुख १०२ मते, काँग्रेसच्या सीमा देशमुख ९३ मते, तर नोटाला ३ मते मिळाली. प्रभाग पाचमध्ये राष्ट्रवादीच्या मनीषा देशमुख यांना १८९ मते, भाजपाच्या राजकन्या देशमुख १५६ मते, काँग्रेसच्या निलोफर खान पठाण २८ मते, तर नोटाला २ मते मिळाली. प्रभाग सहामध्ये राष्ट्रवादीच्या शालिनी देशमुख यांना १६२ मते, शिवसेनेच्या वनिता महाजन १२० मते, भाजपाच्या सुमन गाढवे ७९ मते, काँग्रेसचे गजानन देशमुख १ मत मिळाले.

प्रभाग सात मध्ये भाजपाच्या राधा देशमुख यांना १२९ मते, काँग्रेसच्या तारामती देशमुख ७५ मते, शिवसेनेच्या हर्षा अगस्ती ७३ मते, अपक्ष सीमा उफाड ५६ मते, अपक्ष अर्चना भवर ६ मते मिळाली. प्रभाग आठमध्ये शिवसेनेचे शिलानंद वाकळे यांना २३९ मते, भाजपाचे संतोष मुडे ४७ मते, राष्ट्रवादीचे सुरेश बहिरे १० मते, काँग्रेसचे विष्णू खंदारे ३ मते तर नोटाला ६ मते मिळाली. प्रभाग नऊमध्ये शिवसेनेच्या ज्योती देशमुख यांना २६९ मते, भाजपाचे गोविंदा विटकरे ९५, काँग्रेसचे गणेश जारे १७ मते तर नोटाला ३ मते मिळाली. प्रभाग दहामध्ये काँग्रेसच्या विमलबाई गाढवे यांना १३८ मते, राष्ट्रवादीचे कैलास देशमुख १२२ मते, शिवसेनेचे सुंदर खाडे ७९ मते, भाजपाच्या चंद्रकला लोखंडे ६९ मते, मनसेचे दत्तराव देशमुख २ मते तर नोटाला १ मत मिळाले. प्रभाग आकरामध्ये शिवसेनेच्या शिलाबाई कोकाटे यांना १४५ मते, भाजपाचे गजानन घोगरे ६२ मते, काँग्रेसच्या जयश्री साबळे ८ मते, राष्ट्रवादीचे गजानन दुभळकर ६ मते तर नोटाला ६ मिळाली. प्रभाग बारामध्ये भाजपाच्या मीरा खाडे यांना १७५ मते, काँग्रेसच्या मिनाक्षी शिंदे ६१ मते, शिवसेनेच्या उर्मिला खाडे ५७ मते, राष्ट्रवादीच्या अलकाबाई अंभोरे ११ मते, वंचितच्या रंजना जावळे ७ मते तर नोटाला ४ मते मिळाली. प्रभाग तेरामध्ये राष्ट्रवादीच्या उषा मानकर यांना १५७ मते, शिवसेनेच्या वनिता हनवते ८९ मते, भाजपाच्या वंदना सुतार २३ मते तर नोटाला ३ मते मिळाली.

प्रभाग १४ मध्ये काँग्रेसचे ओमप्रकाश देशमुख यांना १६३ मते, राष्ट्रवादीचे उमेश देशमुख १३२ मते, शिवसेनेचे पांडुरंग फटांगळे ९७ मते तर नोटाला ९ मते मिळाली. प्रभाग क्र.१५ मध्ये भाजपाच्या प्रयागबाई फटांगळे यांना २५३ मते, काँग्रेसचे प्रभूआप्पा जिरवनकर १८२ मते, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख १ मत, अपक्ष गणेश जारे १३ मते तर नोटाला २ मते मिळाली. प्रभाग क्र. १६ मध्ये राष्ट्रवादीच्या स्वाती बहिरे १०५ मते, भाजपाच्या शांता वानरे ७३ मते, शिवसेनेच्या वैशाली जुमडे ४९ मते, काँग्रेसच्या आशा वाघमारे १४ मते, वंचितच्या शोभाबाई वाघमारे ४ मते तर नोटाला ४ मते मिळाली. प्रभाग क्र.१७ मध्ये शिवसेनेचे निखिल देशमुख यांना १९५ मते, भाजपाचे गोपाळराव देशमुख १५९ मते, काँग्रेसच्या सीमा देशमुख ४ मते, राष्ट्रवादीचे १ मत मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादी ५, शिवसेना ५, भाजपा ५ तर काँग्रेसला दोन जागेवर विजय मिळवता आला आहे. तहसील कार्यालयात मतमोजणी झाली असून परिसरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी विजयी झालेल्या राजकीय पक्षांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. तर काही ठिकाणी तगड्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT