Sameer Wankhede Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sameer Wankhede: समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार? NCBच्या कायदेशीर सल्लागाराने मानहानीचा खटला केला दाखल

एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीच्या कोर्टात हा दावा दाखल करण्यात आला आहे. एनसीबीचे कायदेशीर सल्लागार जपन बाबू हे समीर वानखेडे विरोधात कोर्टात गेल्याची माहिती समोर येत आहे.

हा खटला 6 ऑक्टोबर रोजी दिल्ली मॅजिस्ट्रेट कोर्ट, पटियाला हाऊस येथे दाखल करण्यात आला. तर बाबू यांच्यासोबत झालेल्या संभाषणाचा काही भाग वानखेडे यांनी त्यांच्या रीटमध्ये जोडला होता. आर्यन खानला अटक करण्यास वानखेडे बरोबर असल्याचं सिध्द करण्यासाठी ट्रान्सस्क्रीप्ट आले होते. पण ज्यांचे ट्रान्सस्क्रीप्ट जोडले होते, त्या जपन बाबू यांनी समीर वानखेडे यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे.

या प्रकरणात वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आर्यन खानला अटक करण्यात जेव्हा वानखेडे बरोबर असल्याचं सिध्द करण्यासाठी ट्रान्सस्क्रीप्ट जोडण्यात आले होते.

बाबू यांनी आरोप केला आहे की, वानखेडेचे दावे, 2 जून 2022 रोजी संभाषण झाले होते, जिथे बाबू यांनी त्याला अभिनेते शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवर आरोपपत्राच्या मसुद्यात प्रस्तावित आरोपांबद्दल माहिती दिली होती, हे पूर्णपणे खोटे आहे आणि वानखेडे यांच्या कल्पना आहेत असंही म्हटलं आहे.

एजन्सीच्या एफआयआरमध्ये वानखेडेंवर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अडकवू नये म्हणून 25 कोटी रुपये उकळण्याचा कट रचल्याचा आणि त्यानंतर अभिनेत्याकडून 50 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.

एनसीबीमध्ये अतिरिक्त कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत असलेले इंडियन लीगल सर्व्हिस (आयएलएस) अधिकारी जपन बाबू यांनी वानखेडे यांच्या विरोधात ६ ऑक्टोबर रोजी दिल्ली न्यायालयात खटला दाखल केला आणि सांगितले की, वानखेडे यांनी त्यांच्याबाबत केलेले दावे पूर्णपणे खोटे आणि काल्पनिक आहेत आणि त्यांनी वानखेडे बरोबर असे कोणतेही संभाषण केले नव्हते.

जपन बाबू यांनी आपल्या तक्रारीत वानखेडेचे आरोप निराधार असून प्रामाणिक सरकारी अधिकारी म्हणून त्यांची प्रतिष्ठा डागाळण्याचा हेतू असल्याचे म्हटले आहे. आरोपपत्र उप-कायदेशीर सल्लागाराने तयार केले नव्हते आणि वानखेडे यांनी दावा केल्याप्रमाणे असे कोणतेही संभाषण कधीच झाले नसल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Visa Services: भारतीय प्रवाशांना अलर्ट! UAE मध्ये पासपोर्ट आणि व्हिसा सेवा बंद राहणार; जाणून घ्या नेमके कारण

Pune Grand Tour 2027 : पुणे ग्रँड टूर २०२७ अंतर्गत भोर–राजगड–मुळशीतील १७ रस्त्यांसाठी १९७ कोटींची मंजुरी; १३० किमी रस्ते डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार

Latest Marathi Live Updates: वाळूशिल्प साकारून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या

विहिरीत उतरल्यावर समोर आली भूतकाळातील धक्कादायक रहस्ये! पाहा कसा आहे 'घबाड-कुंड' चित्रपट?

Mumbai Electricity: मुंबईत रिंग नेटवर्क उभारणार, १५ हजार कोटींचा खर्च; वीजपुरवठ्यासाठी टाटा पॉवरचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT