Sharad Pawar House Attack Updates google
महाराष्ट्र बातम्या

पवारांच्या घरावरील हल्लाप्रकरणी काहीजण ताब्यात; पत्रकारही रडावर

पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी पत्रकारांचा जबाबही नोंदवणार, पत्रकारांच्या अडचणीत वाढ

सकाळ डिजिटल टीम

पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी पत्रकारांचा जबाबही नोंदवला जाणार, पत्रकारांच्या अडचणीत वाढ

Sharad Pawar House Attack: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्लाप्रकरणी आता आणखी काही लोकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी एक नवी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. पवारांच्या (Sharad Pawar) घरावरील हल्ल्याप्रकरणी आता काही पत्रकारांचाही जबाब नोंदवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या या वृत्तामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याप्रकरणात काही पत्रकारही पोलिसांच्या रडारवर असून पोलिस अधिकचा तपास करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

शुक्रवारी शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला झाल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडल्या आहेत. यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं असून एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या हल्याप्रकरणी आता आणखीन काहीजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात दोन ते तीन एसटी (ST Strike) कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. याआधही ११० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आणखी काही लोकांना काल ताब्यात घेण्यात आले आहे. अटक केलेल्यांना आज गिरगाव न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

दरम्यान, आता या प्रकरणात पत्रकारांचा जबाबही नोंदवला जाणार असल्याने पत्रकारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पवार यांच्या घरावर हल्ला आणि आंदोलन होणार आहे हे आधीपासून काही पत्रकारांना माहिती होतं. त्यामुळे यामध्ये कोणत्या पत्रकारांचा समावेश होता याचा तपास सुरु आहे. याशिवया या पत्रकारांचा जबाबही नोंदवला जाणार असल्याने पत्रकारांच्या अडचणीत वाढ होणार आहे. पोलिसांकडून या पत्रकारांची चौकशी सुरु आहे. तसेच त्यादिवशीचे सीसीटिव्ही फुटेजही तपासले जात आहे. या सर्व तपासानंतरच या प्रकरणात पत्रकारांची नेमकी काय भूमिका होती हे समोर येणार आहे. त्यामुळे संशयित पत्रकारांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT