Prakash Ambedkar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar : "शरद पवार हे भाजपसोबतच आहेत, तुम्हाला लवकरच कळेल"

शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीनंतर महाविकासआघाडीमध्ये धुसफूस

सकाळ डिजिटल टीम

राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीनंतर महाविकास आघाडीमध्ये धुसफूस दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना शरद पवार यांच्यावर निशाणा साधत 'शरद पवार हे भाजपसोबतच आहेत, तुम्हाला लवकरच कळेल', असा खळबळजनक गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही उद्धव ठाकरे यांना अल्टिमेटम दिल्याचे दिसून येत आहे.

'उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीबाबतचा महाविकास आघाडीसंदर्भातला निर्णय लवकर जाहीर करावा. आपण लवकर बसून ठरवू. उद्धव ठाकरे जेवढ्या लवकर निर्णय जाहीर करतील तेवढं चांगलं होईल,' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एबीपी या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 'संघटितपणे काम कारणं ही आमची भूमिका आहे. सगळ्यांना बरोबर घेणं हा आमचा सकारात्मक दृष्टीकोन आहे. फक्त येणाऱ्यांचं लवकर ठरलं तर बरं होईल. अनेकजण ऐनवेळी आमचं यांचं पटलं नाही म्हणून आम्ही स्वतंत्र उभे राहिलो हे दाखवतात. त्यातून बरीच मतं बाजूला काढण्याचं काम होतं, ज्यामुळे भाजपचा फायदा होतो', अशी भीतीही जयंत पाटील यांनी बोलून दाखवली आहे.

अजित पवार - देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी बाबतही जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नव्हता, त्यामुळे शरद पवारांनी ती खेळी खेळली. राष्ट्रवादी फुटली नाही, शिवसेनेचेच आमदार सोडून गेले. राष्ट्रवादीने शेवटपर्यंत शिवेसनेला साथ दिली हे नाकारता येणार नाही, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT