Sharad Pawar On Maratha Reservation eSakal
महाराष्ट्र बातम्या

''इतरांच्या ताटातून मराठ्यांना आरक्षण नको, सर्वपक्षीय बैठकीत असंच ठरलेलं...'' शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

Marathas do not want reservation from other people's plate, it was decided in the all-party meeting...

संतोष कानडे

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अजित पवार गटाने जी भूमिका जाहीर केली होती, तशीच भूमिका शरद पवार यांनी रविवारी स्पष्ट केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत नेमकं काय ठरलं होतं, याची आठवण शरद पवारांनी करुन दिली. (Sharad Pawar on Maratha Reservation)

माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, सबंध देशामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामुळे ज्यांना आरक्षण नाही परंतु परिस्थिती गरीब त्यांना न्याय मिळेल.

''मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बौलावली होती. मीही त्या बैठकीला उपस्थित होतो. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. परंतु हे करत असतांना दुसऱ्याच्या ताटातून काढून घेतलं नाही पाहिजे. त्यासाठी केंद्र सराकरने निर्णय घ्यावा, तसाच ठराव आम्ही बैठकीत घेतला होता.''

यावेळी शरद पवारांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवून इतर कोणालाही धक्का न लावता स्वतंत्रपणे आरक्षण देता येईल, असं पवारांनी स्पष्ट केलं.

राज्यामध्ये मराठा-ओबीसी जो वाद सुरुय, त्यावरुन पवारांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यात भाजपचा हात असल्याचंही पवारांनी सांगितलं.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरची तारीख दिलेली आहे. या तारखेनंतर मुंबईत आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. त्यामुळे राज्य सरकार २४ तारखेपर्यंत आरक्षणाचा निर्णय घेणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT