Sharad Pawar soaked in rain again photo viral nashik tour supriya sule tweet Yeola Sabha NCP Crisis ajit pawar  
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar News : भाग गए रणछोड सभी..! पवार पुन्हा पावसात भिजले; इतिहास घडणार?

रोहित कणसे

महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ विधानसभा निवडणुकीदरम्यान शरद पवारांनी साताऱ्यात कोसळत्या पावसात घेतलेली ती सभा खूप गाजली होती. शरद पवारांचं पावसात भीजत केलेलं ते भाषण ऐतिहासीक ठरलं. त्या एका सभेने राज्यातील सगळं सत्ताकारण बदलून टाकलं होतं. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर शरद पवार पुन्हा पावसात भिजले आहेत.

राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली असताना शरद पवार पुन्हा एकदा अॅक्शन मोडवरती आल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांचा पावसात भिजल्याचा फोटो शेअर केला आहे.

अजित पवारांनी बंड करत शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. त्यानंतर शरद पवारांनी मी न्यायालयीन लढाई लढणार नाही तर जनतेच्या न्यायालयात जाणार असल्याची घोषणा केली. शरद पवारांनी महाराष्ट्रात सर्व बंडखोर आमदारांच्या मतदार संघात सभा घेणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आज शरद पवारांची बंडखोर आमदार छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात येवला येथे पहिली जाहीर सभा होत आहे.

या सभेला जात असताना कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे जागोजागी जंगी स्वागत केले. दरम्यान शरद पवार येवल्याच्या दिशेने जात असताना ते पावसात भिजल्याचे पाहायला मिळालं. मागच्या वेळी शरद पवार जेव्हा पावसात भिजले होते तेव्हा त्याचा परिणाम राज्यातील राजकारणात पाहायला मिळाला होता. आता शरद पवार पुन्हा एकदा पक्ष उभारणीसाठी राज्य पिंजून काढताना पावसात भिजले आहेत. याचा राजकिय लढाईत काय परिणाम होतो हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

"भाग गए रणछोड़ सभी, देख अभी तक खड़ा हूँ मैं ना थका हूँ ना हारा हूँ रण में अटल तक खडा हूॅं मैं" असं कॅप्शन देत खासदार सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचा फोटो शेअर केला आहे.

शरद पवारांकडून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेद जागी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यादम्यान शरद पवार गटातील आमदार त्यांचा हा पोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT