Shahaji Patil News | Shiv Sena News 
महाराष्ट्र बातम्या

'मी जिवंत असेपर्यंत माझे नेते उद्धवजी ठाकरेच राहतील'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षात आपल्याला 240 कोटींचा विकासनिधी दिला

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षात आपल्याला 240 कोटींचा विकासनिधी दिला

सध्या सोशल मीडियावर सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या आवाजातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी म्हटंलेली काही वाक्य सध्या चांगलीच चर्चेत आहे. 'आम्ही सध्या गुवाहाटी आहे. काय झाडी, काय डोंगार, काय हाटील...येकदम ओक्केमध्ये आहे', या डायलॉगमुळे ते या तापलेल्या राजकीय वातावरणात चर्चेत आले आहेत. सध्या अनेक मीम्स या डायलॉगवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. (Shahaji Patil News)

या पार्श्वभूमीवर आता शहाजी पाटलांची सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेतील संवाद व्हायरल होत आहे. माझ्यावर कोणताही अन्याय झालेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षात आपल्याला 240 कोटींचा विकासनिधी दिल्याचं ते सांगत आहेत. तसंच मी जिवंत असेपर्यंत माझे नेते उद्धवजी ठाकरे हेच राहतील, असंही ते म्हणाले होते. (Shiv Sena News)

सध्या आमदार शाहजी पाटील यांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं आहे. पुरेसा विकासनिधी मिळत नसल्याने पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. येणाऱ्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील मग आपल्या मतदारसंघात ऐतिहासिक कामं करु असंही ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, नुकत्याच व्हायरल झालेल्या पत्रकार परिषदेतील संवादात विकासनिधीबाबत माझ्यावर कोणताही अन्याय झाला नाही, असं शहाजी पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र यापूर्वीच्या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमध्ये माझं घरदार बरबाद झालं. पाटलाची सून असून माझ्या बायकोला लुगडं मिळालं नाही, अशी खंत आमदार शाहाजी पाटील यांनी व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder: केतन हत्याकांडानंतरही सियाचा निर्ढावलेपणा कायम; लॉकअपमध्ये केली अशी मागणी की पोलिसही चकित

Maharashtra Weather: राज्यात पावसाचा जोर वाढणार! मुंबईसह २३ जिल्ह्यांना अलर्ट, हवामान विभागाचा नवा अंदाज

Latest Marathi News Live Update : भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन ताशी १२० किमी वेगाच्या अंतिम चाचणीसाठी जिंदहून रवाना

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट ! सियाला केतनसोबत लोहगडावर जायचे नव्हते, पण... आईचा मोठा दावा

Music Benefits: गाण्यामुळे मनाला का मिळते एवढी शांतता ? जाणून घ्या,'म्युझिक थेरपी'मागचं विज्ञान...

SCROLL FOR NEXT