shivaji artwork sakal
महाराष्ट्र बातम्या

५ हजारांहून अधिक रुबिक्स क्युब्ज वापरून शिवरायांची प्रतिमा; एनडी स्टुडिओमध्ये विश्वविक्रम

मुंबई, रायगड , पुणे व नवी मुंबई येथील ५ हजार २३ शालेय विद्यार्थी आणि कलाकारांनी १३ बाय १२ फुटांची प्रतिमा तीन तासांमध्ये साकारली.

नमिता धुरी

मुंबई : 'महाराष्ट्र दिना'निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत ५ हजार पेक्षा जास्त रुबिक्स क्युब्स वापरून त्यांची भव्य प्रतिमा साकारत विश्वविक्रम करण्यात आला आहे. एनडी स्टुडिओमधील 'महा उत्सव' दरम्यान मुंबई, रायगड , पुणे व नवी मुंबई येथील ५ हजार २३ शालेय विद्यार्थी आणि कलाकारांनी १३ बाय १२ फुटांची प्रतिमा तीन तासांमध्ये साकारली. 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रतिमा बनवण्यात आली. 'एन डी आर्ट वर्ल्ड' आणि सहआयोजक 'व्हर्सैटाईल एज्युकेशन सिस्टीम' यांच्या पुढाकाराने हा विश्व विक्रम करण्यात आला.

महाराष्ट्राच्या महान परंपरेचा वारसा जपणाऱ्या 'महा उत्सव'ची १ मे रोजी सांगता झाली. महामेळा, महाकला, महाखेळ, महासंस्कृती, महास्वाद, महाव्यवसाय आणि महागौरव असे महाराष्ट्राच्या महान परंपरेचे सप्तरंगी इंद्रधनुष्य महाराष्ट्रात अवतरले. श्रेयसी वझे आणि मंदार आपटे यांच्या संकल्पनेने बनलेले 'महाराष्ट्र गीत' यावेळी सादर करण्यात आले. तर गायक नंदेश उमप यांचा 'मी मराठी' हा सुरेल कार्यक्रम आणि मराठ्यांची गौरव गाथा मांडणाऱ्या 'महा नाट्य' यांनी रसिकांची मने जिंकली. या महोत्सवाला देशातील वेगवान कृषी आणि मत्स्यपालन कंपनी 'ए एस अ‍ॅग्री' आणि 'अ‍ॅक्वा एलएलपी' यांचे सहकार्य लाभले आहे. व्हर्टिकल फार्मिंग क्लस्टर प्रकल्पाद्वारे हळदीच्या क्रांतिकारक उत्पादनाबाबत जागरूकता करणारा प्रकल्प यावेळी सादर करण्यात आला.

"नितीन चंद्रकांत देसाई यांच्याद्वारे आयोजित हा महा उत्सव कलाकारांचा व कलेचा महाकुंभ आहे. या महाउत्सवमध्ये कित्येक कलाकारांना व्यासपीठ मिळाले, रोजगार मिळाला. विशेष म्हणजे सर्वांना या ठिकाणी प्रवेश विनामूल्य देऊन या उत्सवाचा लाभ घेता आला. त्याबद्दल नितीन देसाई यांचे मी कौतुक करतो व त्यांना शुभेच्छा देतो." असे मत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले

''टाळेबंदीनंतर हजारो कलाकारांना प्रोत्साहन देत त्यांना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावं, रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने महा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक कलाकारांची स्वप्ने साकार होत असल्याने या उत्सवाचा उद्देश साध्य होत असल्याचं पाहून समाधान वाटतं.'' अशा भावना ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी व्यक्त केल्या. 'महाकला' उपक्रमाद्वारे राज्यातल्या विविध लोककलांचे मनोहारी दर्शन घडले. कलाकार सचिन जुवाटकर यांनी उद्योगपती रतन टाटा यांचं साकारलेलं चित्र चर्चेचा विषय ठरलं. मोती, तुळस, रक्तचंदन आदी गोष्टींचा वापर करत हे चित्र त्यांनी तयार केलं आहे. हे चित्र पाहताच सचिन यांना टाटा फाऊंडेशकडून फोन आला असून लवकरच ते रतन टाटा यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election Nomination : पुणे महापालिका निवडणूक; पहिल्या दिवशी अर्ज भरण्याकडे उमेदवारांची पाठ!

आलिया- रणबीरच्या लग्नात 'या' गोष्टीच्या विरोधात होत्या नीतू कपूर; मुळीच आवडला नव्हता सुनेचा तो निर्णय

चित्रपट संस्कृतीचा मानदंड! २२व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सुरूवात; कधी आणि कुठे होणार सोहळा?

Jemimah Rodrigues बनली कर्णधार, आता स्मृती मानधना, हरमप्रीत कौरलाही देणार टक्कर! तीन वेळा उपविजेत्या ठरलेल्या संघाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सदानंद दाते लवकरच महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक!

SCROLL FOR NEXT