छत्रपती शिवाजी महाराज निकिता जंगले
महाराष्ट्र बातम्या

शिवजयंती : पुण्यवंत, सामर्थ्यवंत! नीतिवंत, जाणता राजा!

रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप उत्तमपणे रचला.

निकिता जंगले

रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) खूप उत्तमपणे रचला. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारून त्यांनी महाराष्ट्र घडवला. याच आपल्या राज्याचा आज जन्मदिवस. छत्रपतींचे नाव डोळ्यासमोर आले एक वेगळीच प्रतिमा तयार होते ज्या राजाने त्याचे संपूर्ण आयुष्य जनतेसाठी रयतेसाठी वाहले त्या रयतेच्या राजाचे कौतुक करावे तितके कमी आहे.शिवरायांचा हिंदवी स्वराज्य निर्मितीचा ध्यास असो, महाराष्ट्र घडवण्याचा त्यांचे योगदान असो, मराठा साम्राज्याचा इतिहास असो, महाराजांचे कार्य आणि त्यांचे शौर्य सदैव प्रेरणादायी आहे.

शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. खरं तर त्यांच्या जन्मतारखेबद्दल बरेच वाद होते यावर महाराष्ट्र सरकारने तोडगा काढत 2001 या वर्षी 19 फेब्रुवारी ही जयंती शिवरायांची जन्मतारीख निश्चित केली आणि तेव्हापासून 19 फेब्रुवारीला शिवजयंती देशभरात उत्साहात साजरी केली जाते.

आदिलशाही, निजामशाही आणि मुघल सत्ता किंवा स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला अत्यंत धैर्याने छत्रपती शिवाजी महाराजानी सामना केला आणि ते यशस्वी ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा अजरामर आहे त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य रयतेच्या सुखासाठी स्वराज्याच्या स्वप्नासाठी वाहले. शेवटच्या क्षणापर्यंत ते लढले. अखेर रायगडावर ३ एप्रिल १६८० रोजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. एक दक्ष राजा रयतेला पोरका करून गेला. मात्र महाराजांचं कर्तृत्व पराक्रम अनंत काळासाठी अजरामर आहे.

असे म्हणतात.. महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांनी 1869 साली रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ शोधून काढले आणि त्यांनी महाराजांच्या जीवनावर आधारित पहिला पोवाडा लिहला.

शिवजयंती आली की शिवरायांचा आपण जयघोष करतो मात्र केवळ आणि केवळ शिवजयंती पर्यंतच महाराजांना मर्यादित ठेवायचे आहे का याचा विचार करायला हवा. महाराजांच्या नावाचा जयघोष करणाऱ्यांचा महाराष्ट्रात सुकाळ आहे आणि त्यांच्या विचारांना कृतीत आणणार्‍या लोकांचा मात्र दुष्काळ आहे ही महाराष्ट्राची सध्याची वास्तविकता आहे.

आज खरं तर महाराष्ट्राला शिवाजी महाराजांच्या आचार-विचारांची गरज आहे महाराजांनी शिकवलेल्या त्या छोट्या छोट्या मूल्यांची जपणूक करण्याची गरज आहे महाराष्ट्रातील महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे या सर्व व्यतिरिक्त महाराजांच्या आदरांजली देण्याकरिता केवळ आणि केवळ शिवजयंतीच्या चौकटीत न राहता शिवरायांची विचारसरणी आत्मसात करून ती प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणे आवश्यक आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मुंबईच्या वायु प्रदुषणाची क्रिकेटपटूंना धास्ती! Sarfaraz Khan सह अनेक जणं 'मुखपट्टी' घालून खेळायला उतरले

Latest Marathi News Live Update : बारामतीत NDRF टीम दाखल; घटनास्थळी करणार पाहणी

Belgaum Schools : केपीएस मॅग्नेट योजनेमुळे हजारो सरकारी शाळांवर टांगती तलवार; बेळगाव जिल्ह्यात ग्रामस्थ रस्त्यावर

Google Photos: फोनमध्ये बोलून करु शकाल फोटोज एडिट, गुगलने लाँच केले भन्नाट फीचर

Indian Army Jobs 2026: कोणतीही लेखी परीक्षा नाही! भारतीय सैन्यात स्पेशल भरती जाहीर; ट्रैनिंगनंतर लॉ स्टुडंट्स थेट लेफ्टनंट होणार

SCROLL FOR NEXT