uddhav thackeray and eknath shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: “एकनाथ शिंदेंनी स्वत: मातोश्रीवर पैसे दिले, त्याच तुकड्यावर...", नेत्याचा मोठा खुलासा

शिंदे गटाच्या आमदाराने एकनाथ शिंदेबाबत मोठा खुलासा केला

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात अनेक दावे प्रतिदावे केले जातात. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात खंडणीखोर सरकार असून त्यांनी पैसे गोळा करण्यासाठी अनेक एजंट नेमले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांच्या या व्यक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापलं असून सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी मातोश्रीवर पैसे दिले. संजय राऊतांसारखी लोक एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या तुकड्यावर मोठे झाले आहेत, असं संजय गायकवाड यांनी म्हंटलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

राऊतांच्या टीकेवर संजय गायकवाड म्हणाले, “एकनाथ शिंदे हे पैसे वसुल करणारे किंवा खंडणी घेणारे नेते नाहीत. ते लोकांना दोन्ही हातांनी दान देणारे आहेत. त्यांनी ‘मातोश्री’वर किती पैसे दिले असतील, हे त्यांनाच माहीत नसेल. त्यामुळे संजय राऊतांसारख्या माणसाने आरोप करताना हे पाहिलं पाहिजे".

"एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पैशावरच त्यांच्या दुकानदाऱ्या सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या तुकड्यावर तुम्ही मोठे झाले आहात. आता त्यांनाच तुम्ही नावं ठेवता. एकनाथ शिंदे उदार मनाचा माणूस आहे, त्यांनी सगळ्यांना भरभरून दिलं आहे”, असं गायकवाड म्हणालेत.

गायकवाड पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर १०० टक्के पैसे दिले आहेत. त्यात काहीही नवीन नाही. अनेक नेत्यांनी मातोश्रीवर पैसे दिले आहेत.” तुम्हीही मातोश्रीवर पैसे दिले होते का? असं विचारल्यानंतर गायकवाड म्हणाले, “माझी तेवढी औकात नाही.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT