Gulabrao Patil  Sakal
महाराष्ट्र बातम्या

शिंदेंच्या गोटात सामील होताच गुलाबराव पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल

विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यातील ढवळून निघालेलं राजकीय वातावारण काही केल्या थंडावतांना दिसत नाहीये.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यातील ढवळून निघालेलं राजकीय वातावारण काही केल्या थंडावतांना दिसत नाहीये. त्यात शिवसेनेचे जळगावची धडाडणारी तोफ म्हणजेच गुलाबराव पाटील हे देखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गोटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे (Shivsena) एक एक आमदार आता शिंदेंच्या गळाला लागत असल्याचे समोर आले आले आहे. या सर्वामध्ये गुलाबराव पाटलांचा (Gulabrao Patil) एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. (Gulabrao Patil News Maharashtra Politics )

व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय?

सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये गुलाबराव पाटलांना शिवसेनेचे आमदार (Shivsena MLA) फुटू शकतात अशी भिती वाटतेय का? असा प्रश्न विचारण्यात आला असून, या प्रश्नाला गुलाबरावांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले आहे. यात त्यांनी “कोई माई का लाल फोड सकता है जो उनको म्हणजेच आमदार? फोडना है तो आ जाए सामने. ये सब्जी मंडी थोडी है के कोई बैंगन लेके जाए, कोई भरता लेके जाए.. हिंमत है तो आ के ले जाए”, असं उत्तर देताना दिसत आहेत. गुलाबराव पाटलांची हे उत्तर सद्याच्या राज्यातील वातावरणाला अगदी समर्पक असं आहे.

पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महापौर प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून गुलाबराव पाटील यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये गुलाबराव त्यांच्या खास शौलीत माध्यम प्रतिनिधीला उत्तर देताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ एबीपी न्यूजला दिलेल्या एका प्रतिक्रियेचा आहे. तो असून तो नेमका कधीचा आहे, याविषयी खुलासा होऊ शकलेला नसून, गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे जळगाव येथील आमदार आहेत. त्यांची ओळक एक आक्रमक नेते, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates : गावातील रस्त्याना आले नदीचे स्वरूप

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT