shivsena podcast video esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena Video : बंडाच्या दिवशी शिंदे समोरच्या सीटवर बसून कुणाशी फोनवर बोलत होते?, देशमुखांचा थरारक अनुभव

संतोष कानडे

मुंबईः आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आमदार नितीन देशमुख यांचा एक पॉडकास्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंसोबत नितीन देशमुख यांनाही गाडीत बसवून नेण्यात आलेलं होतं. त्या प्रसंगाची संपूर्ण आपबिती त्यांनी विषद केलीय.

शिवसेनेच्या पॉडकास्टमध्ये आमदार नितीन देशमुख सांगतात की, विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मला विधानभवनातच भेटले आणि म्हणाले नितीन आपण बंगल्यावरुन जावून येऊ. मी परतीची तिकीटं काढून ठेवली होती. परंतु मी निघालो. पीएला फोन करुन ठाण्याला बॅगा घेऊन येण्यास सांगितलं.

देशमुख पुढे सांगतात, आम्ही ठाण्याऐवजी थेट पुढे निघालो आणि पालघरला गेलो. एका ठिकाणी चहाला थांबलो तेव्हा तिथे मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भूमरे, शंभूराज देसाई यांच्या गाड्या दाखल झाल्या. मला कुणकुण लागली की काहीतरी गडबड आहे. परंतु आपण शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत, हे मला ठाऊक होतं. मी पानटपरीवाल्याला विचारलं हा रस्ता कुठे जातो. तो म्हणाला सुरतला जातो.

एकनाथ शिंदे सलग फोनवर बोलत होते

पालघरमधून कोल्हापूरच्या आमदारांना दुसऱ्या गाडीत बसवून दिले. मी शिंदेंच्या गाडीत बसलो होतो. शिंदे साहेबांचा पीए प्रभाकर सोबत होता. तसेच संदीपान भूमरे, अब्दुल सत्तार असे चौघे मागच्या सीटवर. शिंदे साहेब समोरच्या सीटवर बसलेले होते. मात्र यादरम्यान शिंदेंचे फोन सुरु झाले. एकनाथ शिंदे सलग फोनवर बोलत होते. तो निघाला का, हा निघाला का.. त्या गाड्या कुठपर्यत पोहोचल्या, या गाड्यात कुठवर्यंत पोहोचल्या... मग मला सगळा अंदाज आला. परंतु मी ठाम होतो. असा थरारक अनुभव नितीन देशमुख यांनी सांगितला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT