maharashtra politics esakal
महाराष्ट्र बातम्या

ते जेम्स बॉन्ड किंवा शेरलॉक होम्सच्या वेशात...; राऊतांचा अमृता फडणवीसांवर 'रोखठोक' निशाणा

धनश्री ओतारी

"शिंदे यांनी आमदारांसह जे बंड केले, त्याच्याशी भाजपचा संबंध नाही असे सांगणारे भाजपवाले उघडे पडले. शिंदे यांनीच पडद्यामागचे सारे कारस्थान विधानसभेत फोडले व आता सौ. अमृता फडणवीस यांनीच घरातले गुपित फोडले. अमृता यांनी फोडले नसते तर या महान कलावंताची महाराष्ट्राला ओळखच झाली नसती" असे म्हणत शिवसेनेने सामाना रोखठोकमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. (sanjay raut slams bjp devendra fadnavis over eknath shinde maharashtra politics)

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं. यानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याला पूर्णविराम मिळाला. याच दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र, या सर्व सत्तानाट्यामागे खरे चाणक्य देवेंद्र फडणवीस ठरले अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आणि यासंदर्भात खुलासाही त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी केला होता. दरम्यान, यासर्व नाट्याचा सामना अग्रलेखात समाचार घेण्यात आला आहे.(maharashtra politics)

काय म्हटले आहे सामना रोखठोक मध्ये?

‘‘या सर्व काळात देवेंद्र फडणवीस हे रात्री-अपरात्री वेषांतर करून शिंदे यांना भेटण्यासाठी बाहेर पडत.’’ काळा कोट, काळा चष्मा, फेल्ट हॅट असे जेम्स बॉण्ड किंवा शेरलॉक होम्स पद्धतीचे वेषांतर करून ते बाहेर पडत असावेत. त्यांच्या तोंडात चिरूट वगैरे आणि हातात नक्षीदार काठी होती काय? याचाही खुलासा व्हायला हवा. पंतप्रधान मोदी हे कपड्यांचे व रूप पालटून फिरण्याचे शौकीन आहेत, पण फडणवीसही तेच करू लागले. त्यांनी शिंदे यांना भेटायला जाताना काही वेळेस नकली दाढी-मिश्याही लावल्या असाव्यात. हे सर्व रहस्य त्यांच्या पत्नी सौ. अमृता यांनी फोडले नसते तर या महान कलावंताची महाराष्ट्राला ओळखच झाली नसती. सौ. फडणवीस यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. असे म्हणत खोचक टोला फडणवीसांना लगावण्यात आला आहे.

मोदी यांचे अनुकरण त्यांच्या लोकांनी किती करावे ते पहा. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सत्तांतर घडवून आणण्यासाठी जे वेषांतर केले ते सर्व कपडे व ऐवज पुढील पिढीसाठी एखाद्या संग्रहालयातच ठेवले पाहिजेत. असा टोमणा हाणत बगदादचा खलिफा हरुन-अल-रशीद अनेकदा वेषांतर करून त्याच्या राज्यात रात्रीचा फिरत असे, पण तो का फिरत असे? आपल्या राज्याचे प्रशासन, सरदार प्रजेशी नीट वागत आहेत ना? प्रजेला काय समस्या आहेत? आपले राज्य नीट चालले आहे ना? राज्यकारभार करताना आपल्याला कोणी फसवत तर नाही ना? हे जाणून घेण्यासाठी; पण नागपूरचे व ठाण्याचे हरुन-अल-रशीद वेषांतर करून भेटत होते ते बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे कारस्थान तडीस नेण्यासाठी. असा आरोप करण्यात आला.

हरुन-अल-रशीद हा उत्तम खलिफा, पण बगदादला जसा चांगला राजा होता तसा चोर व लुटारूंचा सुळसुळाट होता. ‘थीफ ऑफ बगदाद’ किंवा ‘अलिबाबा चाळीस चोर’ या सर्व कथा आणि दंतकथा बगदादशी संबंधित आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला लाभलेले नवे हरुन-अल-रशीद नक्की काय करणार? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सत्तास्थापनेपूर्वीच्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटींविषयी मोठा गौप्यस्फोट केला.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एक्सक्लुजिव्ह मुलाखतीत अमृता फडणवीस म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांना भेटायला जाण्यासाठी देवेंद्रजी वेशांतर करून जायचे. शिवाय देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, हे देखील आपल्याला आधीच माहित होतं, असंही त्यांनी म्हटलं.

याआधी एकनाथ शिंदे यांनी देखील सभागृहातील बहुमत चाचणीनंतर केलेल्या दिलखुलास भाषणात सरकार स्थापनेसंदर्भातील अनेक गुपित गोष्टींचा उलगडा केला होता. शिंदे म्हणाले होते की, मी आणि देवेंद्र फडणवीस अंधार झाल्यावर भेटायचो. त्याचवेळी सत्तांतर काही एका दिवसात झालं नाही असंही ते म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT