Uddhav Thackeray suspend eknath shinde from shiv sena Legal challenge to decision mumbai  Sakal
महाराष्ट्र बातम्या

ठाकरेंना मोठा धक्का! अजय चौधरींची मान्यता रद्द; गटनेतेपदी एकनाथ शिंदेच

गटनेते अजय चौधरींची मान्यता रद्द झाली असून गटनेतेपदी एकनाथ शिंदे हेच राहणार आहेत.

दत्ता लवांडे

मुंबई : उद्धव ठाकरे यांना आज दोन मोठे धक्के बसले आहेत. शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांची मान्यता रद्द करण्यात आली असून गटनेतेपदी एकनाथ शिंदे हेच राहणार आहेत. यासंदर्भात विधीमंडळाने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत माहिती दिली आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे सुनील प्रभू यांचंही मुख्य प्रतोदपद रद्द करण्यात आलं असून शिंदे गटाकडून मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांना मान्यता देण्यात आली आहे. विधिमंडळ सचिवालयाने ही मान्यता दिली असून या दोन्ही निर्णयामुळे शिवसनेच्या उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे.

(Eknath Shinde Vs Uddhav Thackeray)

कायदेशीर तरतुदीनुसार आणि कायदेशीर बाबींचा विचार करूनच विधिमंडळाने हा निर्णय घेतला असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले आहेत. शिवसेनेसाठी आजचे हे दोन मोठे धक्के आहेत. याबरोबरच आज भाजपने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकही जिंकली असून राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत. दरम्यान शिवसेनेचे राजन साळवी यांना १०७ मत पडले असून त्यांचा पराभव झाला.

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत सुरत गाठलं होतं. मंतर त्यांनी आपल्यासोबत काही आमदारांना घेऊन गुवाहटी गाठलं आणि त्यांच्या गटात सामील होणाऱ्या आमदारांची रीघ लागली. शिवसेनेतील तब्बल ३९ आमदार फोडल्यानंतर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी करत अजय चौधरी यांना गटनेते करण्यात आलं होतं. तसेच विधिमंडळाच्या मुख्य प्रतोदपदी सुनील प्रभू यांची निवड करण्यात आली होती.

यानंतर शिंदे गटाने आपल्याकडे पक्षाचे दोन तृतियांश आमदार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यावेळी शिंदे गटाने विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले आणि गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केली होती. शिंदे गटाने विधिमंडळ ही मान्यता विधिमंडळ सचिवालयाने मान्य केली आहे. त्याचबरोबर सुनील प्रभू यांचे गटनेतेपद रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे शिवसेनेचे विधिमंडळ गटेनेते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहणार आहेत. या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

SCROLL FOR NEXT