sudhir mungantiwar said This government will fall and BJP will come to power in four months 
महाराष्ट्र बातम्या

'गर्जा महाराष्ट्र माझा' गीताला 'राज्यगीता'चा दर्जा; मुनगंटीवारांची घोषणा

अनेक वर्षांपासून या महाराष्ट्र गौरव गीतानं सर्वांची मनं जिंकली आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' महाराष्ट्राला आता राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळं अनेक वर्षांपासून मराठीजनांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या महाराष्ट्र गौरव गातीनं आता खास जागा घेतली आहे. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याची घोषणा केली. (Song Garja Maharashtra Majha has status of state anthem of Maharashtra)

या घोषणेची माहिती देताना मुनगंटीवार म्हणाले, “गर्जा महाराष्ट्र माझा हे उत्साह वाढवणारं गीत असून या गीताच्या शब्दांमध्ये एक उर्जा आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा अशी भावनाही यामध्ये आहे. हे गीत मोठं असून साडेतीन मिनिटं चालतं पण यातील दोन कडवी घेऊन त्याला राज्यगीताचा दर्जा देण्याचा विचार आम्ही केला आहे”

दरम्यान, या गीतातील राज्यगीत म्हणून निवडलेली दोन कडवी कुठली असतील आणि त्याची अंमलबजावणी कधी आणि कशी केली जाईल याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

काय आहे हे गीत?

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी

एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी

भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा

जय जय महाराष्ट्र माझा…

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा…

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी

दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला

देशगौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा..

जय जय महाराष्ट्र माझा…

----

संगीत - श्रीनिवास खळे

गीतकार - राजा बढे

गायक - शाहीर साबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT