SportWoman from nashik complaint against karnataka police
SportWoman from nashik complaint against karnataka police esakal
महाराष्ट्र

नाशिकच्या यामिनीची यशस्वी झुंज; अखेर कर्नाटक पोलिसांवर गुन्हा दाखल

विक्रांत मते

नाशिक : महामार्गावरून मध्यरात्रीच्या सुमारास महिलांना शक्यतो न अडविण्याचा प्रघात आहे. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्‍न असेल तर थांबविण्यास हरकत नाही. परंतू तपासणी केल्यानंतर तत्काळ वाहन सोडणे अपेक्षित असते, परंतू एक फेब्रुवारीच्या मध्यरात्री नाशिकच्या यामिनी खैरनार यांना विचित्र अनुभव आला तो कर्नाटकाच्या बेलुर्गी चेकनाक्यावरील पोलिसांचा. मात्र मुळातचं झुंज देण्याची क्रिडा वृत्ती अंगी असल्याने पोलिसांच्या खाऊगिरीच्या दबावतंत्राला न जुमानता तब्बल साडे सात तास झुंज दिली. अखेरीस पोलिस उपनिरीक्षकांसह दोन पोलिसांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर झुंज यशस्वी ठरतं पोलिसांना माफी मागण्याची वेळ आली. या वादात चेक पोस्ट वरून अन्य राज्यातील वाहनांना कोणीचं न अडविल्याने महाराष्ट्र द्वेषाची कर्नाटकी वृत्तीचा अनुभव समोर आला आहे. (SportWoman from Nashik complaint against Karnataka police)

चेक नाक्यावर दाक्षिणात्य चित्रपटांतील दृश्‍याप्रमाणे घडले प्रसंग

नाशिकच्या क्रीडा क्षेत्रातील नावाजलेल्या यामिनी खैरनार अक्कलकोटहून कर्नाटकातील गाणगापुर येथे ३१ जानेवारीला वाहनाने निघाल्या. महाराष्ट्र- कर्नाटकाला जोडणाऱ्या महामार्गावरील महाराष्ट्राच्या हद्दीतील दुधनी चेक पोस्टवर त्यांच्याकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाणपत्र (corona vaccination certificate) मागण्यात आले. प्रमाणपत्र दाखविल्यानंतर पुढे प्रवास करताना शक्यतो वाहने थांबवू नका, थांबविली तर वाहनांच्या खाली उतरू नका असा सल्ला महाराष्ट्र पोलिसांकडून दिल्याने आश्‍चर्य व्यक्त झाले. दुधनी चेक नाक्यापासून आठ ते दहा किलोमीटर अंतर पार करताना कर्नाटकाच्या बेलुर्गी चेक नाक्यावर दाक्षिणात्य चित्रपटांतील दृश्‍या प्रमाणे प्रसंग घडले.

'तुम्ही यांचे काहींचं करू शकतं नाही...'

अचानक वाहनासमोर बेरिकेडस पडले. गाडी थांबविल्यानंतर सिसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या रेंज बाहेर वाहन नेण्यात आले. कोरोना लसीकरणाबरोबरचं आरटीपीसीआर (RT-PCR) प्रमाणपत्राची मागणी केली. युनिक प्रमाणपत्र असल्याचे सांगूनही पोलिसांनी दाद दिली नाही. कर्नाटकात याच राज्यातील प्रमाणपत्र हवे असे सांगण्यात आले. तसे असेल तर शासन आदेश दाखविण्याची मागणी यामिनी यांनी केली. मागणी करणारे तुम्ही कोण असा प्रतिप्रश्‍न करून सुटका करायची असेल तर सेटलमेंट करण्याचा सल्ला देण्यात आला. यामिनी यांनी ओळखपत्राची मागणी केली. पोलिसांकडून नकार देण्यात आला. वाद विकोपाला गेला. या दरम्यान यामिनी यांनी ट्विट करून मदतीची याचना केली. मदत मिळालीच नाही. ११२ क्रमांकाच्या मदतकक्षाला कळविले. सव्वा ते दिड तासांनी त्यांच्या मदतीला व्हॅन आली. परंतू न्याय देण्याऐवजी मांडवलीचा सल्ला दिला गेला. तुम्ही यांचे काहींचं करू शकतं नाही अशी टिप्पण जोडली.

पोलिसांकडून फिल्मी डॉयलॉग मारून बोळवण

चेकनाक्यावर बंदोबस्तासाठी ज्यांना ठेवले त्यांच्या तोंडावर मास्क नव्हते. अखेर वादावादीनंतर पहाटे साडे तीन वाजता अफजलपुर पोलिस ठाणे गाठले तेथेही पोलिस झोपलेले. तक्रार अर्ज फेकला. तुम्ही निघून जा असा फिल्मी डॉयलॉग मारून बोळवण केली. भाषेची अडचण असली तरी यामिनी यांनी गुगलच्या भाषांतराच्या सोईतून डीसीपी, एसपींचा क्रमांक मिळविला. त्यावर कॉल केल्यानंतर दहा मिनिटानंतर पोलिस अधिक्षक ईशा पंत यांच्याशी संपर्क झाला. सर्व हकिकत कथन केल्यानंतर सकाळी सात वाजेच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक विश्‍वनाथ, पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठला व अन्य दोघा महसुल व आरोग्य अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला.

''कागदपत्रांची मागणी करणे चुक नाही परंतू महाराष्‍ट्रा व्यतिरिक्त ईतर राज्यातील वाहनांना तपासणी न करता सोडले जात होते. त्यातही महिला असल्याने तत्काळ सोडणे अपेक्षित होते परंतू पैशांसाठी अडवणुक केली जात होती. त्यामुळे चुकीच्या कामा विरुध्द लढणे भाग होते.'' - यामिनी खैरनार, क्रीडापटू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT