ssc hsc exam 
महाराष्ट्र बातम्या

जिथे शाळा तिथे दहावी, बारावीच्या परीक्षा होणार; कोरोनामुळे बोर्डाकडून प्रत्येक शाळेला केंद्र मिळण्याची शक्यता

संदीप लांडगे

औरंगाबाद : दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला दरवर्षी विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात असते. यंदा कोरोनामुळे या परीक्षा फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रात वाढ होणार आहे. जिथे शाळा तिथे परीक्षा घ्यावी लागणार असल्याचे बोर्डातील अधिकाऱ्यानी सांगितले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात.

यासाठी प्रत्येक वर्गात २५ विद्यार्थी याप्रमाणे केंद्राची निवड केली जाते. साधारणतः दरवर्षी दहावी, बारावीच्या परीक्षेला औरंगाबाद विभागातून साडेतीन लाख विद्यार्थी प्रविष्ट होतात. मागील वर्षी विभागातून दहावीच्या परीक्षेला एक एक लाख ८६ हजार ६६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यासाठी ६१६ परीक्षा केंद्रांची निवड करण्यात आली होती. तर बारावीच्या परीक्षा ३८८ केंद्रावर झाली होती.

त्यासाठी एक लाख ६८ हजार ४२३ विद्यार्थी बसले होते. कोरोनामुळे यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी मंडळाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कोरोनामुळे यावर्षी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत परीक्षा पार पाडावी लागणार आहे. यासाठी प्रत्येक वर्गात २५ ऐवजी फक्त १२ किंवा तेरा विद्यार्थ्यांना बसावे लागणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. परिणामी, परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांमध्ये देखील वाढ करावी लागणार आहे. त्यामुळे यंदा जिथं शाळा तिथं परीक्षा घेण्याचे नियोजन बोर्डाकडून करण्यात येत असल्याचे मंडळातील अधिकाऱ्याने सांगितले.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

उन्हामुळे होणार परवड
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर, तर दहावीच्या परीक्षा एक मेनंतर घेणार असल्याचे सांगितले आहे. या दोन महिन्यांत कडक उन्हाळा असतो. मराठवाडा, विदर्भात तापमान ४८ अंशांपेक्षा जास्त असते. ग्रामीण भागातील बहुतांश शाळेच्या खोल्या पत्र्याच्या असतात. अशावेळी तीन तास पेपर सोडवताना विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. अनेक मुलामुलींना ग्रामीण भागातील केंद्रावर अडथळ्यांचा प्रवास करून पेपर देण्यासाठी केंद्रावर पोचावे लागते.  

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलांनो! राजकारणात पडू नका; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी व्यथित माजी मंत्र्याची 'शेवटची चिट्ठी', कार्यालयात आढळला मृतदेह

Congress Leader Murder : काँग्रेस नेत्याची मुलासह निर्घृणपणे हत्या ! कारला घेरलं, गोळ्या झाडल्या अन् धारदार शस्त्रांनी बाप-लेकाला संपवलं

Marathi News Live Updates : ड्रग्स तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी विरेंदर बसोया न्यायालयात हजर

तू कोणाचातरी मर्डर करायला हवा होतास... अंकुर वाढवेला मित्राने सांगितलेलं असं काही; जेवायला बोलावलं आणि...

LPG Cylinder Booking: आजपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही एलपीजी सिलिंडर;ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT