Alcohol 
महाराष्ट्र बातम्या

ना दारू विकणार, ना पिऊ देणार!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रस्ते-महामार्गांलगत असलेल्या ढाब्यांवर राजरोस अवैधरीत्या मद्याची विक्री होते हे एव्हाना लपून राहिलेले नाही. अशा ढाब्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क वा पोलिसांकडून कारवाई होते; परंतु पुन्हा ढाबेचालकांकडून तोच कित्ता गिरविला जातो.

पण नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला असून, 'ना दारू विकणार, ना दारू पिऊ देणार' असे हमीपत्र ढाब्यावाल्यांकडून लिहून घेतले जात आहे. हमीपत्र लिहून दिल्यानंतरही जर पथकाच्या कारवाईत ढाबेवाला सापडला, तर गुन्हा दाखल करतानाच त्याचे सारे परवानेच रद्द करण्याचीही कारवाई उत्पादन शुल्क विभागाकडून केली जाणार आहे. 

देशात रस्ते अपघातांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. प्रामुख्याने यात अपघात हे मद्याच्या नशेत होत असल्याचा निष्कर्ष पुढे आला होता. सर्वोच्च न्यायालयाने ही बाब गांभीर्याने घेत रस्ता अपघात रोखण्यासाठी व मृत्यूच्या प्रमाणाला आळा बसण्यासाठी रस्ते-महामार्गालगत पाचशे मीटरपर्यंतच्या मद्यविक्री दुकानांवर बंदी आणली होती.

परिणामी, शासनाच्या महसुलावर परिणाम झाल्याने शासनाकडून न्यायालयात बाजू मांडली गेली आणि त्यात शिथिलता आणली गेली. मात्र त्यानंतर महामार्गालगतच्या ढाब्यावर अवैधरीत्या मद्यविक्री व मद्यपानाचे प्रकार वाढीस लागले. याविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक वा पोलिसांकडून कारवाई होते. परंतु या कारवाईत अनेक लागेबांधे असल्याने ही कारवाई आजपर्यंत निरुपयोगी ठरत आहे. 

नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. 'ढाब्यावर ना दारू विकणार, ना दारू पिऊ देणार' असा हा अभिनव उपक्रम आहे. त्यासाठी नाशिक शहरालगतचे महामार्ग, रस्त्यांलगत ढाब्यांवर उत्पादन शुल्क अधिकारी जातील. ढाब्यामालक-चालकाकडून थेट 'ना दारू विकणार, ना दारू पिऊ देणार' असे हमीपत्र लिहून घेणार आहेत.

ढाबेचालकांची मद्यपानाविरोधात जनजागृतीही केली जाणार आहे. हमीपत्र लिहून दिल्यानंतरही त्या ढाब्यावर अवैध मद्यविक्रीची माहिती मिळाली आणि कारवाई झाली, तर गुन्हा दाखल होणार आहे. शिवाय त्या ढाब्याला देण्यात आलेले सर्व परवाने रद्द करण्यात येणार आहेत. 

ढाब्यांवर होणारी अवैध मद्यविक्री या मोहिमेमुळे रोखण्यास मदत होणार आहे. मद्यपानामुळे होणाऱ्या अपघातांनाही आळा बसेल. ढाब्यांवर मद्यविक्री वा मद्यपान होणार नाही यालाच प्राधान्यक्रम आहे. 
- अर्जुन ओहोळ, उपायुक्त, उत्पादन शुल्क, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

वय वाढण्याआधीच मानेवर रेषा दिसू लागल्यात? या टेक लाइन्स घालवण्यासाठी जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितले ४ सोपे व्यायाम

SCROLL FOR NEXT