Kolhapur Police Force esakal
महाराष्ट्र बातम्या

Police Force : नामकरण ते निवृत्ती.. 'या' श्‍वानांचा पोलिस दलात वेगळाच थाट; डायट, दिनचर्या आणि बरंच काही..

प्रत्येक श्‍वानासाठी दोन हॅण्डलरची निवड केली जाते. हे हॅण्डलर पोलिस दलातीलच कॉन्स्टेबल, हवालदार, नाईक पदावरील कर्मचारी असतात.

लुमाकांत नलवडे

श्‍वानांची निवड करण्यासाठी खास नियमावली आहे. साधारण दीड महिने ते सहा महिन्यांच्या काळातच हे श्‍वान खरेदी केले जाते.

स्टेला (Stella Dog), बेली (Bailey), ग्लोरी, शेला आणि लिना ही नावे कोणा प्रसिद्ध व्यक्तीचे नव्हे, तर ती आहेत पोलिस दलातील (Kolhapur Police Force) श्‍वानांची. ज्यांच्यामुळे पोलिसांना गुन्हेगारापर्यंत पोचण्यास मदत होते. काय असेल यांचा थाट, काय असेल डायट, कशी असेल याची दिनचर्या, यांच्यासाठी काय काय करावे लागत असेल, असे कुतूहल सर्वसामान्यांच्या मनात असते. याच श्‍वानांच्या जीवनशैलीवर एक नजर...

असे होते नामकरण...

श्‍वानांची निवड करण्यासाठी खास नियमावली आहे. साधारण दीड महिने ते सहा महिन्यांच्या काळातच हे श्‍वान खरेदी केले जाते. त्याचे नामकरण करतानाही पाच-सहा नावांची निवड केली जाते. ही सर्व नावे जिल्हा पोलिस अधीक्षकासमोर ठेवली जातात. त्यानंतर विविध पर्यायापैकी एका नावाची निवड होते. पुढे त्या नावाने त्याला बोलावणे सुरू होते. म्हणजेच त्याचे नामकरण केले जाते. साधारण सहा ते पंधरा वर्षांपर्यंत त्यांची देखभाल पोलिस दलात केली जाते. पोलिस दलातील त्यांचे निवृत्तीचे वय अंदाजे पंधरा समजले जाते.

एका श्‍वानासाठी दोन हॅण्डलर...

प्रत्येक श्‍वानासाठी दोन हॅण्डलरची निवड केली जाते. हे हॅण्डलर पोलिस दलातीलच कॉन्स्टेबल, हवालदार, नाईक पदावरील कर्मचारी असतात. त्यांच्याकडूनच श्‍वानाची देखभाल पाहिली जाते. त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे आरोग्य, त्यांच्या सवई पाहण्याचे काम हे हॅण्डलर करतात. ज्या ठिकाणी कॉल येईल (घटनास्थळी बोलावणे) तेथे शक्य तितक्या लवकर श्‍वानासह पोचण्याचे काम या हॅण्डलरकडून होते. त्यामुळे हॅण्डलरची ड्यूटी २४ तास समजली जाते.

नऊ महिने चंदीगडमध्ये ट्रेनिंग...

श्‍वानांना पुणे आणि चंदीगड येथे ट्रेनिंग दिले जाते. साधारण नऊ महिन्यांसाठी हे ट्रेनिंग असते. यासाठी श्‍वानासह त्यांचे दोन हॅण्डलरसुद्धा ट्रेनिंग सेंटरमध्ये नऊ महिने थांबून असतात. त्या ठिकाणी रोज पहाटे उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावर प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये विशेष प्रोत्साहन मिळण्यासाठी बक्षीस म्हणून मासांचे तुकडेही खायला दिले जातात. वासावरून व्यक्तीचा मार्ग ओळखणे, वस्तूवरून व्यक्ती ओळखणे, चोरट्यांचा माग काढणे, माग काढण्यासाठी चार-पाच किलोमीटर चालत, धावत जाणे यांसह अन्य ट्रेनिंग तेथे दिले जाते.

अशी असते निगा...

दहा-पंधरा दिवसांतून एकदा पूर्ण अंघोळ घालणे. त्यांना कोणताही त्वचा रोग होऊ न देणे. डॉग फूड वेळेवर आणि नियमाने देणे. रोज आवश्‍यक तितका सराव घेणे. श्‍वानांचा विमा (इन्शुरन्स) वेळेवर अपडेट करणे. त्यांच्या तब्येतीनुसार त्यांची वैद्यकीय तपासणी शासकीय पशुसंवर्धन विभागातून करून घेणे, अशी कामे हॅण्डलरला करावी लागतात. त्याच्या नोंदी ठेवाव्या लागतात.

श्‍वानांचा वापर दोन पद्धतीने

एखादा गुन्हा घडला तर तो शोधण्यासाठी श्‍वानाची मदत गुन्हेगाराच्या मुळापर्यंत घेऊन जावू शकते. एवढेच नव्हे तर एखाद्या कार्यक्रमापूर्वी तेथे काही अक्षेपार्ह आढळ्यास गस्त घातल्यामुळे होणारा अनर्थ ही टाळला जावू शकतो. त्यामुळे गुन्हा घडल्यानंतर त्या ठिकाणी जाणारे श्‍वान आणि एखाद्या सभेपूर्वी, व्हीआयपी येण्यापूर्वी तेथे गस्त घालण्यासाठी नेण्यात येणारे श्‍वान अशी त्यांचीही विभागणी आहे. सध्या ‘ग्लोरी’ आणि ‘बेला’ या दोघींकडून सध्या व्हीआयपी दौऱ्यासह आवश्‍यक त्या ठिकाणी कार्यक्रमापूर्वीची गस्त घातली जाते. दोघींची वये साधारण सहा वर्षे आहेत. बॉम्ब शोध पथकात त्या कार्यरत आहेत.

हे आहेत हॅण्डलर

दीपक अष्टेकर, प्रदीप सुर्वे, पृथ्वीराज निंबाळकर, प्रदीप माने, कृष्णात झेंडे, राहुल माळी, अरुण पाटील, अनिल धनी, भगवान माधव आणि राजेंद्र डाके हे श्‍वान पथकातील हॅण्डलर आहेत. त्यांना या कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांचा तपासात अधिक उपयोग होत आहे. विशेष करून चोरी वेळी चोरटे कोणत्या दिशेला पळाले आहे यांसह इतर माहिती त्यांच्याकडून अचूक अंदाजाने मिळू शकते.

मयताच्या चप्पलाच्या वासावरून खुनीपर्यंत पोचविण्याचे काम ‘स्टेला’ने केला आहे. वडिलांनीच मुलाचा खून करून अपहरण केल्याचा बनाव केला होता. या श्‍वानांच्या मदतीनेच हा खून उघडकीस आला. शिवाय श्‍वान त्याच परिसरात फिरत असल्याच्या निरीक्षनातूनही असे अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात या श्‍वानाचा सहभाग आहे. त्यामुळे कळत न कळत पोलिस दलात यांचे महत्त्‍व अधोरेखित झाले आहे.

- पी. एम. सर्वे, हॅण्डलर

महिन्याला सरासरी दोनशे कॉल येतात. गुन्हा घडल्यानंतर ४८ तासांपूर्वी हे पथक घटनास्थळी पोहोचते. बेलीला चंदीगडमध्ये, तर शेलाला पुण्यात प्रशिक्षण दिले आहे. बॉम्ब शोध पथक, नार्को आणि गुन्हेगार अशा तीन प्रकरात पाच श्‍वानांची विभागणी केली आहे. गुन्ह्याच्या ठिकाणी, सभेच्या ठिकाणी, तर तिसऱ्या श्‍वानाचा रेल्वे, बसस्थानक अशा ठिकाणी नार्कोटेस्टसाठी उपयोग केला जातो. त्यांची जडणघडण व्यवस्थित ठेवावी लागते. पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व विभाग कार्यरत आहे.

- राजेंद्र डाके, हॅण्डलर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजार वाढीसह उघडला; निफ्टी 80 अंकांनी वधारला, कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

IND vs AUS : रोहित शर्मा, विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती घेणार? BCCI ने स्पष्ट केली भूमिका; ही त्यांची शेवटची मालिका...

Zilla Parishad Politics : जिल्हा परिषदेसाठी कायपण! ‘सरकार’, ९६ कुळी, म्हणून घेणारे होणार ‘कुणबी’; स्वतःसह सौभाग्यवतींचेही काढले दाखले

Missing Lawyer Case : तीन महिन्यांपासून वकील बेपत्ता, शिंदे गटाच्या 'या' आमदारावर गंभीर आरोप; किशोरी आरडे म्हणाल्या, 'माझ्या पतीच्या जीवाला..'

Latest Marathi News Live Update : झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणासंदर्भात एसआयटी/सीआयडीने अटक केलेल्या श्यामकानु महंता, सिद्धार्थ शर्मा आणि इतरांना आज न्यायालयात हजर करणार

SCROLL FOR NEXT