Subhash Desai
Subhash Desai 
महाराष्ट्र

'मुख्यमंत्री आजारी असल्याने राज्याच्या कारभारात काही फरक पडलेला नाही'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असल्यानं राज्याच्या कारभारात काही फरक पडलेला नाही. ते कॅबिनेटमध्ये नेहमी असतात, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी सांगितले. सुभाष देसाई यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार देण्यात येणार अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. याबाबत ते आज सोमवारी (ता.२०) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. देसाई पुढे म्हणाले, मुख्यमंत्री अधिवेशनात सहभागी होतील. सोशल मीडियावर काय येतयं ते माहिती नाही. रामदास कदमांची पक्ष (Ramdas Kadam) दखल घेईल. ते नेते आहेत. गंभीर मुद्दे असतील तर गंभीर दखलच घेतली जाईल, असे स्पष्टीकरण त्यांनी कदम यांच्याबाबत दिले. दोन वर्षांनी ते हे बोलतायत. ही त्यांची निराशा आहे. आणखी ३ वर्षे वाट पाहा.(Subhash Desai Said, Chief Minister Uddhav Thackeray Is Sick, But Not Affect State Function)

नियमांप्रमाणेच तेव्हा मुकाबला आहे. काय होतंय ते पाहा, असे त्यांनी अमित शहा यांच्या आव्हानाला उत्तर दिले. हिंदुत्वावर संकट येईल तेव्हा हेच लोक शेपूट घालून बसतील, असा टोला सुभाष देसाई यांनी भाजपला लगावला आहे. मी काही त्या पार्टीत नव्हतो. बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय नेहमी, असे प्रत्युत्तर त्यांनी आशिष शेलार यांना दिले. अमित शहा यांनी तीनचाकी सरकार असा टोला (Mumbai) महाविकास आघाडीवर केला होता. त्याचा समाचार घेताना देसाई म्हणाले, की आमचे प्रेम तीनचाकीवरच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT