sudhir tambe on suspension action by congress nashik graduate constituency election issue Maharashtra politics  
महाराष्ट्र बातम्या

Sudhir Tambe News : निलंबनाच्या कारवाईनंतर सुधीर तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आता…

सकाळ डिजिटल टीम

nashik graduate election : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारीवरून राज्यातील राजकारण तापलेलं आहे. कॉंग्रेसने डॉ.सुधीर तांबे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना कॉंग्रेस पक्षातून निलंबित केलं. यानंतर सुधिर तांबे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस पक्षाकडून झालेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर सुधीर तांबे यांनी प्रतिक्रिया देताना मला या बद्दल काहीही बोलायचं नसल्याचे सांगितेल ते म्हणाले की, आता पक्ष चौकशी करतोय, ती होईपर्यंत मी काही बोलणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपमध्ये सहभागी होण्याच्या प्रश्नावर बोलतान सुधीर तांबे म्हणाले की, अशा चर्चा होत असतात, त्यात काही तथ्य नाहीये. भाजपला आम्ही पाठिंबा मागितलेला नाही. आम्ही मागीतला नसताना ते तरी कसे देतील? असेही तांबे यावेळी म्हणाले.

मात्र सत्यजीत तांबे यांनी भाजपकडे निवडणूकीत मदत करण्याची मागणी केली होती याबद्दल विचारले असता हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा असे माध्यमांशी बोलताना सुधीर तांबे म्हणाले आहेत.

तसेच "माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे." असे ट्विटही त्यांनी केले आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पंरतु,त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला नाही. उलट त्यांचा मुलगा सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं सांगत चौकशी पूर्ण होईपर्यंत डॉ. सुधीर तांबे यांचं काँग्रेस पक्षातून निलंबन केलं गेलं आहे.

यानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणात हायकमांडला अहवाल पाठविला होता. त्यानंतर काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने निलंबनाची कारवाई केली आहे. सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. तसेच आता त्यांच्याविरोधात चौकशीही केली जाणार आहे. त्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत हे निलबंन असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate will be arrest : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

मेल-एक्सप्रेस आणि लोकलच्या संख्येत वाढ, प्लॅटफॉर्मचा विस्तार, नवीन 238 ऑटोमॅटिक डोअर गाड्या... प्रवाशांसाठी मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला; अटकेसाठी नाशिक पोलिस मुंबईला रवाना

SCROLL FOR NEXT