Viral Video of Shivgarjana Esakal
महाराष्ट्र बातम्या

Video: चिमुकलीच्या शिवगर्जनेनं अवघा महाराष्ट्र दुमदुमला!

Viral Video of Shivgarjana : एका चिमुकलीचा शिवगर्जनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या दोन दिवस एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय. अनेकांच्या व्हॉट्सअ‍ॅप तसेच फेसबूक स्टेटससह सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर हाच व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होत होता. या चिमुरडीने असं नेमके काय केलं की संपूर्ण महाराष्ट्रभरातील लोकांच्या सोशल मीडियावर फक्त हाच व्हिडीओ दिसत होता. या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होण्याचं कारण म्हणजे एका चिमुरडीचा शिवगर्जना (Shivgarjana). उभ्या महाराष्ट्रातील लोकांच्या अंगावर शहारे आणणारी ही शिवगर्जना शिवप्रेमींना प्रचंड आवडली आणि या व्हिडीओ अगदी कमी वेळात सर्वत्र व्हायरल झाला. (The video of a girl chanting Shivgarjana is going viral in Maharashtra)

२ जानेवारी रोजी झालेल्या जीवधन किल्ल्याच्या (Jivdhan Fort) ‘स्वराज्याचे प्रवेशद्वार, दुर्गार्पण सोहळा’ पार पडला. याच सोहळ्यादरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या चिमुरडीच्या शिवगर्जनेनं तमाम शिवप्रेमींच्या काळजाचा ठाव घेतला.

@sahyadri_pratishthan_offical या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या आईच्या कडेवर बसलेली एक मुलगी आपला उजवा हात छातीवर ठेवून पूर्ण जोर लावून शिवगर्जना म्हणायला सुरुवात करते. यावेळी चिमुकलीची नजर आकाशाकडे शिवप्रेमी असते. ‘गडपती, गजअश्वपती, भूपती…’ अशी तिची शिवगर्जना सुरु असते. तिथं उपस्थित सर्व शिवप्रेमी या घोषणेदरम्यान स्तब्ध होते.

दरम्यान व्हिडीओच्या कॅप्शननुसार या चिमुरडीचं नाव देवांशी आहे. या व्हिडीओला ‘संस्कार सह्याद्रीचे, सह्याद्रीची बाल दुर्गसेविका, देवांशी किल्ले जीवधन प्रवेशद्वार सोहळ्यात गारद, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

किल्ले जीवधन गडसंवर्धनाचं काम दुर्गप्रेमी काही दिवसांपासून करत आहेत. किल्ले जीवधनचा पायरीमार्ग अक्षरश: बुजला होता त्याकडे कोणी पाहतही नव्हतं नुसतं गड चढून वर जायचं म्हणलं तरी दमछाक होत असे. म्हणूनच जीवधन किल्ल्याचा पायरी मार्ग मोकळा करायचं सहयाद्रीच्या दुर्गसेवकानी ठरवलं आणि २७ ते २८ मोहिमांद्वारे हा पायरी मार्गाने मोकळा केला आणि सह्याद्री प्रतिष्ठान शिवजन्मभूमीने घेतलेला संकल्प पूर्ण झाला.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ अनेक पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. कित्येक लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. अनेकांनी या व्हिडीओ कमेंट्स करत या मुलीचं कौतुक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT