Shivani Bhatnagar Murder Case 
Shivani Bhatnagar Murder Case  डिजिटल टीम सकाळ
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील राजकीय स्कँडल : महाजनांना अडचणीत आणणारं प्रकरण माहितीये?

निकिता जंगले

शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण हलत नाही असं म्हणतात. पण गेल्या दोन तीन वर्षात राज्यात अनेक नेत्यांवर त्यांच्या चारित्र्यावर जोरदार आरोपसत्र सुरु झालंय. माजी वनमंत्री संजय राठोड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यापासून ते माजी आमदार विजय शिवतरे, आमदार गणेश नाईक यांच्यापर्यंत कित्येक जणांवर अनैतिक प्रेमसंबंधांचे आरोप झाले. या आरोपांचा खरेखोटेपणा अजून सिद्ध झालेला नसला तरी हे आरोप महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नैतिकतेचा घसरता आलेख दाखवत आहेत. स्वच्छ चारित्र्य ही एकेकाळच्या राजकारणाची ओळख असली तरी पूर्वी देखील अशा काही घटना घडून गेल्या होत्या.महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अशाच काही गाजलेल्या पॉलिटिकल स्कॅन्डलबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रात असे अनेक स्कँडल झाले मग ते पॉलिटीकल असो की की सिनेजगतातील. त्याचं गुढ आजही कायम आहे. ना मुख्य आरोपी सापडले ना हत्या प्रकरण उलगडले. मागे राहले ते फक्त संशयित नावं. असंच गाजलेलं एक प्रकरण म्हणजे शिवानी भटनागर हत्या प्रकरणं.

23 जानेवारी 1999ला दिल्लीत पटपड़गंज परिसरात एका तरुण मुलीची तिच्या फ्लॅटवरचं डेड बॉडी सापडते,ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून इंडियन एक्सप्रेसची एक नामवंत पत्रकार असते. ती म्हणजे शिवानी भटनागर (Shivani Bhatnagar) आणि मग काय एकच खळबळ उडते. सुरवातीला या हत्येप्रकरणात नाव समोर येतं ते म्हणजे एका आयपीएस अधिकाऱ्याचं. रविकांत शर्मा.

असं म्हणतात रविकांत शर्मा (Ravi Kant Sharma) आणि शिवानी भटनागर या दोघांचे अफेअर होते.शिवानी रविकांतवर लग्नासाठी दबाव आणत होती पण रविकांत आधीच विवाहित होता त्यामुळे त्यांने सुपारी देऊन शिवानीची हत्या केली.

शिवानी भटनागर कोण?

शिवानी भटनागर ही इंडियन एक्सप्रेसचे नामवंत पत्रकार होती. ती विवाहीत होती. तिच्या हत्येनंतर तिचा पती राकेश भटनागरवरही संशयितरित्या बघितले जात होते. त्यांना तन्मय नावाचा मुलगा आहे.

रविकांत शर्माचे आत्मसमर्पण

प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी रविकांत शर्मा यांच्यावर हत्येचा आरोप लावला होता. त्याच वर्षी 3 ऑगस्ट रोजी अटक वॉरंट जारी झाल्यापासून लपून राहिल्यानंतर शर्माने 27 सप्टेंबर 2002 रोजी पोलिसांना आत्मसमर्पण केले. रविकांत शर्मा याला भीती होती की ती त्यांचे प्रेमसंबंध उघड होणार म्हणून त्याने भटनागरला ठार मारले, असं बोललं जाते.

संदर्भ- इंडिया टूडे

रविकांत शर्माच्या पत्नीचा खळबळजनक आरोप

मात्र या प्रकरणाला नवे वळण तेव्हा आले जेव्हा रविकांत शर्माच्या पत्नी मधु शर्माने एक खळबळजनक खुलासा केला. मधु यांनी भाजप नेते प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांच्यावर शिवानीशी घनिष्ट संबंध असल्याचा आरोप केला होता. पतीच्या आरोपांचे खंडन करताना तिने प्रमोद महाजनचा हत्येमध्ये सहभाग असल्याचा दावा केला होता. मधु शर्माने त्यावेळच्या भाजप मंत्र्यावर केलेल्या गंभीर आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती.

याशिवाय ज्या दिवशी शिवानीची हत्या झाली, त्यादिवशी प्रमोद महाजन तिच्याशी चाळीस मिनीटे बोलल्याचा आरोपही मधु शर्माने केला होता.

प्रमोद महाजन कोण?

प्रमोद महाजन हे माहिती व प्रसारण मंत्री या पदावर होतें. त्या काळात ते भाजपचे चाणक्य समजले जायचे सोबतच त्यांची एक वेगळी आणि खास ओळख होती ती म्हणजे भाजपसाठी प्रमोद महाजन हे पॉलिटिकल मॅनेजर होते. वाजपेयी सरकारला अनेक पक्षांनी दिलेला टेकू महाजनांच्या जीवावर उभा होता. पक्षनिधी गोळा करणे, पक्षाच्या प्रचाराचे कॅम्पेनिंग करणे अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असल्यामुळे प्रमोद महाजन यांचं स्थान हे पक्षात अग्रगण्य होतं.

मराठवाड्यात कोणीतही राजकीय पार्श्वभूमी नसताना मध्यमवर्गीय घरातून येऊनही महाजनांनी अतिशय कमी वेळात राष्ट्रीय पातळीवर मजल मारली होती. आपल्या आक्रमक व्यक्तिमत्त्वामुळे ते नेहमीच चर्चेत रहायचे. त्यांच्या राजकारणाच्या स्टाईलमुळे, मोठमोठ्या उद्योगपतींसोबत असलेल्या मैत्रीमुळे त्यांच्या चारित्र्यावर विरोधकांनी अनेकदा गंभीर आरोप केले होते. मात्र भाजपचे पॉवरफुल नेता म्हणून ओळख असल्याने त्यांना यावर कधी स्पष्टीकरण देण्याची वेळ आली नाही.

उलट त्यांच्या संरक्षणासाठी पंतप्रधान वाजपेयी यांच्यापासून अडवाणींपर्यंत अनेक मोठमोठे धावून आले. महाजन यांच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचं भारतीय जनता पक्षाने जाहीर केलं. याप्रकरणी महाजन यांना दिल्ली पोलिसांनी दोषी ठरवले नाही. त्यावेळी शिवानीशी आपले फक्त व्यावसायिक व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.

शिवानी भटनागर - प्रमोद महाजन यांचं कनेक्शन काय होतं?

1998 च्या उन्हाळ्यात शिवानी तीन महिन्यांच्या पत्रकारिता शिष्यवृत्तीवर लंडनला गेली होती. जेव्हा एका सहकाऱ्याने तिला विचारले की तिला लंडनमध्ये तीन महिने राहणे कसे परवडले, तेव्हा ती म्हणाली होती की, एअर-इंडियाशी संबंधीत एक जवळचा व्यक्ती आहे जो तिच्यासाठी तिकीटची सोय करतो.असेच तिने अनेकदा बोलून दाखवले ज्याद्वारे हे स्पष्ट होत होते की तिच्या मागे एक पावरफुल व्यक्ती असून तो तीला सर्व सुख सुविधा पुरवत होता.

सोबतच या दरम्यान लंडनमध्ये असताना ती तिच्या मित्र - मैत्रीणींसमोर रविकांत शर्मा आणि प्रमोद महाजन यांचं नाव घ्यायची.

शिवानी भटनागरप्रकरणी आरोपींना शिक्षा

शिवानी भटनागर हत्येप्रकरणी आयपीएस अधिकारी रविकांत शर्मा यांच्यासह श्री भगवान शर्मा, सत्य प्रकाश आणि प्रदीप शर्मा हे आरोपी होते आणि त्यांना १८ मार्च २००८ रोजी दिल्ली ट्रायल कोर्टाने दोषी ठरवले होते. इतर दोन आरोपी देव प्रकाश शर्मा आणि प्रकाश उर्फ कालू यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. दोषी ठरलेल्यांना 24 मार्च 2008 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

रविकांत शर्मा यांची निर्दोष मुक्तता

12 ऑक्टोबर 2011 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने रविकांत शर्मा, त्यांच्याबरोबर सहआरोपी असलेल्या श्री भगवान शर्मा आणि सत्य प्रकाश यांना अपीलवर पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. प्रदीप शर्मा यांची शिक्षा कायम ठेवली.

रविकांत शर्मा यांची निर्दोष सुटका झाल्यानंतर शिवानी भटनागर यांच्या हत्येचे गुढ आणखी वाढले. जर रविकांत शर्मा हे आरोपी नव्हते तर मग कोण होतं शिवानी भटनागर यांच्या हत्येमागे? त्यानंतर पुन्हा एकदा भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या दिशेने तार जुळले. मात्र त्याचा काहीही फायदा होणार नव्हता. कारण रविकांत शर्मा यांची निर्दोष सुटका होण्याच्या पाच वर्षाआधीच २००६ मध्ये प्रमोद महाजन यांची त्याच्याच सख्या भावाने गोळ्या झाडून हत्या केली होती.

प्रमोद महाजन यांच्या भावाचा खळबळजनक खुलासा

प्रवीण महाजन याने त्याच्या पुस्तकात प्रमोद महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यात त्याने प्रमोद महाजन यांच्या प्रेमसंबंधांबाबतीत अनेक खुलासे केले होते. प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा शिवानी भटनागर हत्याप्रकरण ताजं झालं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Latest Marathi News Live Update: मध्य रेल्वेच्या ३० समर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ

SCROLL FOR NEXT