Abu Azmi Threat Call 
महाराष्ट्र बातम्या

Abu Azmi Threat Call : अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी! काय आहे प्रकरण?

सकाळ डिजिटल टीम

Abu Azmi Threat Call : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. अबू आझमी यांच्या खासगी सचिवाला फोन करुन ही धमकी देण्यात आली आहे. औरंगजेबाबाबत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत फोन करणाऱ्याने आझमी यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अबू आझमी यांना संरक्षण देण्यात येईल, असे दिपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

औरंगजेबाबाबत अबू आझमी यांनी वक्तव्य केले होते. औरंगजेब बादशाह हा वाईट माणूस नव्हता, त्याचा खरा इतिहास जेव्हा समोर येईल तेव्हा हिंदू समाजही ते मान्य करेल, असं विधान अबू आझमी यांनी केले होते. हिंदूंवर हल्ले होत असतील तर मुस्लीमांवरही हल्ले होत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे, या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. 

काय म्हणाले होते अबू आझमी-

औरंगजेब बादशाह वाईट माणूस नव्हता. त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. जर त्यांचा खरा इतिहास समोर आला तर हिंदू नाराज होणार नाहीत. देशभरात अनेकांची नाव औरंगजेब आहेत, असे अबू आझमी म्हणाले होते.

अबू आझमी म्हणाले, महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद, अहमदनगर आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यांची नावे मुस्लीम व्यक्तीच्या नावावरुन आहेत. या जिल्ह्यांची नाव बदलल्यानं कोणाला नोकऱ्या मिळणार नाहीत. महागाई कमी होणार नाही. जर ही नाव बदलून तरुणांना नोकऱ्या मिळणार असतील तर मी या बदलाचं स्वागत करेन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT