Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का, ६ आमदार शिंदेंच्या वाटेवर! मुंबईबाहेर भेटायचं ठरलं

Sandip Kapde

Uddhav Thackeray: अजित पवार यांच्या सत्तेत येण्याने शिंदे गटात नाराजीची चर्चा आहे. मंत्रिपदावरुन देखील गोंधळ निर्माण झाला आहे. शिंदे गटाच्या मंत्रिपदाला कात्री लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांची नाराजी दूर करण्याच्या कामाला लागले आहेत. काल एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर सर्व आमदारांची बैठक घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनी मोठं विधान केले आहे. "शिवसेनेत नाराजी असल्याच्या केवळ अफवा आहेत. आमच्यात मंत्रिपदावरुवन कोणतीही वादावादी झाली नाही आणि होणार नाही.  कोणीतरी सांगितले की ६ ते ७ आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार आहेत. मात्र ही गोष्ट खरी नाही," असे सामंत म्हणाले.

उद्धव ठाकरे गटातील सहा आमदार आमच्या संपर्कात आहेत. काल माझी चर्चा देखील झाली आहे. ठाकरे गटातील आमदार म्हणतात आपल्याला मुंबईत भेटायचे नाही. मुंबईच्या बाहेर भेटूया, असे विधान उदय सामंत यांनी केले आहे.

सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करत आहेत. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे ठाकरे गटातील आमदार आमच्यासोबत यायला तयार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT