Uddhav Thackeray, Aditya Thackeray And Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: ठाकरे पितापुत्रांसह अजित पवारदेखील जेलमध्ये? सहीसाठी देशमुखांवर आला होता दबाव, खळबळजनक खुलासा

Uddhav Thackeray: "महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना निरोप जातो की चार एफिडेव्हिट्स पाठतोय त्यावर सह्या करा, तुम्ही ईडीच्या कारवाई आणि तुरुंगात जाण्यापासून वाचाल."

आशुतोष मसगौंडे

राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार आणि अनिल देशमुख गृहमंत्री असताना 100 कोटींच्या वसुलीचे प्रकरण गाजले होते. त्यानंतर त्यावेळचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना तब्बल तेरा महिन्यांचा तुरुंगवासही भोगायला लागला होता. यासह तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही अनेक आरोप झाले होते. तसेच भाजपसह अनेकांनी ठाकरेंच्या अटकेची मागणी केली होती.

दरम्यान आता या प्रकरणात ठाकरे सरकार आणि विद्यामान सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री अदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्याबाबत सामाजिक कार्यकर्ते शाम मानव यांनी खळबळजनक खुलासे केले आहे. यानंतर राज्यातील राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

100 कोटींचे प्रकरण

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संयोजन सदस्य शाम मानव यांनी नागपूर येथे बोलताना या संपूर्ण प्रकरणाबाबत खळबळजनक खुलासे केले आहेत.

ते म्हणाले की, "महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना निरोप जातो की चार एफिडेव्हिट्स पाठतोय त्यावर सह्या करा, तुम्ही ईडीच्या कारवाई आणि तुरुंगात जाण्यापासून वाचाल. गृहमंत्र्यांचे नाव अनिल देशमुख. त्यांना दिलेल्या पहिल्या एफिडेव्हिटमध्ये लिहिले होते की, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावून दर महिन्याला शंभर कोटी रुपये गोळा करायचा आदेश दिला."

दिशा सलियान आणि अदित्य ठाकरे

शाम मानव पुढे म्हणाले, "दुसऱ्या एफिडेव्हिटमध्ये लिहिले होते की, उद्धव ठाकरे यांचा मुलगा अदित्य ठाकरे तेसुद्धा मंत्री होते. त्यांनी दिशा सालियनवर बलात्कार करुन तिचा खून केला. यावर सही करा. तिसऱ्या एफिडेव्हिटवर ठाकरेंच्या जवळचे अनिल परब यांच्यावरील आरोपांवर अनिल देशमुखांकडून सही मागण्यात आली होती."

अजित पवारांविरोधात एफिडेव्हिट

अनिल देशमुखांना ज्या चार एफिडेव्हिट्सवर सह्या मागितल्या होत्या, त्यातील एक एफिडेव्हिट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधातीलही होती. शाम मानव म्हणाले, "चौथे एफिडेव्हिट फार चमत्कारीक आहे. त्यामध्ये म्हटले होते की, "अजित दादा पवार यांनी मला (अनिल देशमुख) देवगिरी बंंगल्यावर बोलावले त्यावेळी तिथे त्यांचा मुलगा पार्थही होता. त्यांनी मला आदेश दिला की, सर्व गुटखावाल्यांकडून करोडो रुपये गोळा करा."

खोटे आरोप करण्यास देशमुखांचा नकार

"तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ठाकरे आणि पवार यांच्यावर खोटे आरोप करण्यास नकार दिल्यानंतर त्यांना पुन्हा निरोप आला की, जर अजित पवार यांच्या एफिडेव्हिटवर सही करण्यास अडचण असेल तर बाकीच्या तीन एफिडेव्हिटवर सही करावी. पण अनिल देशमुख यांनी खोटे आरोप करण्यास नकार देत स्वता 13 महिने तुरुंगवास भोगला," असे शाम मानव म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

“वयाचं गणित फेल!” – सुबोध-रिंकूच्या जोडीनं सोशल मीडियावर रंगली ट्रोलिंग, रिंकू- सुबोधच्या वयात नक्की किती अंतर आहे?

Latest Marathi News Live Updates : पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा कहर! वांद्र्यात मुलगा बुडाला, शोध घेण्याचे प्रयत्न सुरू, परिसरात भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT