Uddhav Thackeray addresses a press conference targeting the state government over corruption allegations and protests against ministers.  sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray Press: ''भ्रष्टाचारी मंत्र्यांबाबत मुख्यमंत्री, राज्यपालांना पुरावे दिले, तरीही कुणी..'' ; उद्धव ठाकरेंचं विधान!

Uddhav Thackeray criticizes Maharashtra government: या सरकारची भ्रष्टाचार ही अपरिहार्यता झालेली आहे, असंही उद्धव ठाकरेंना टीकास्त्र सोडलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Uddhav Thackeray Slams State Government in Press Conference: शिवसेना उद्ध बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने सोमवारी राज्यभर भ्रष्टाचारी मंत्र्याविरोधात आंदोलन केलं गेलं. मुंबईतील आंदोलनात खुद्द उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. यानंतर त्यांनी पत्रकारपरिषद घेतल सरकारवर जोरदार टीका केली. तसेच भ्रष्टाचारी मंत्र्यांबाबत मुख्यमंत्री, राज्यपालांना पुरावे दिले, तरीही कुणी दाद द्यायला तयार नाही, असंही जाहीरपण सांगितलं.

पत्रकारपरिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ''संपूर्ण महाराष्ट्रात दुपारी भ्रष्टाचारी मंत्र्यांविरोधात शिवसेनेच्यावतीने आंदोलन केलं गेलं. या आंदोलनास तमाम शिवसैनिक जमले होते आणि मीही त्यात सहभागी झालो होतो. संपूर्ण राज्यात आज शिवसैनिक आणि महाराष्ट्रीतल जनता देखील या भ्रष्टाचारी मंत्र्यांना जाब विचारण्यासाठी आज रस्त्यावर उतरली आहे.''

तसेच ''मागील काही दिवसांमध्ये आम्ही या विषयावर सातत्याने आवाज उठवत आहोत. विधिमंडळात, अधिवेशनातही पुराव्यानिशी यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे. अनेक व्हिडिओ आपल्याच(मीडिया)माध्यमातून सर्व जनतेने पाहिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं, त्यांच्याकडे पुरावे दिले. राज्यपालांना शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटलं, राज्यपालांना सुद्धा सांगितलं, परंतु कोणीही दाद द्यायला तयार नाही. कारण, या सरकारची भ्रष्टाचार ही अपरिहार्यता झालेली आहे.'' असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

याशिवाय ''जो कोणी भ्रष्टाचारी असेल, त्याला सोबत घेवून राज्य चालवाचं आणि  भ्रष्टाचाऱ्यांना मुक्त रान द्यायचं, हा एककलमी कार्यक्रम या राज्यसरकारचा झालाय की काय? अशी शंका येते.  हे आंदोलन राज्यात सुरू असताना, दिल्लीत निवडणूक आयोगावरती इंडिया आघाडीचा मोर्चा सर्व खासदारांनी मिळून काढला होता. त्याची देखील दृश्य मीडियाच्या माध्यमातून आज राज्यातील किंवा देशातीलच नव्हे तर सर्व जगातील जनतेने पाहिली आहे.'' असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

याचबरोबर, ''निवडणूक आयोगाला जाब विचारण्यासाठी आंदोलन करणाऱ्या खासदारांना पकडून अटक केली गेली. मला असं वाटतं की, आपल्या देशाच्या लोकशाहीला सरकारने केलेल्या या कृतीन एक बट्टा लागला आहे. सरकारने स्वत:च्याच हाताने लोकशाहीला काळीमा फासलेला आहे. तसं पाहीलं तर ही लढाई निवडणूक आयोगाबरोबर आहे. त्यात भाजप आणि सरकार का पडतय? हे आता उघड झालंय.'' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.

तर ''राहुल गांधींनी, कशाप्रकारे मतांची चोरी झाली हे सर्वांसमोर उघड केलं, सर्वांना दाखवून दिलं, पत्रकारपरिषद घेतली. एकदा त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून शपथ घेतल्यानंतरही निवडणूक आयोग त्यांनाच सांगतय, तुम्ही शपथपत्र द्या. म्हणजे हा कोणता उलटा प्रकार आहे?'' असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळणार! कधी अन् कुठे, IMDने तारीखच सांगितली

Zomato delivery boy accident: झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मुसळधार पावसात पडला उघड्या गटारात अन् मग...

मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवेचे काम अंतिम टप्प्यात, प्रवासात पाच तासांची बचत; कधीपासून होणार वाहतूक सुरु?

Mhada House: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाचे घर होणार आणखी स्वस्त, किती टक्क्यांनी घटणार; वाचा अहवाल

PM Modi and Zelenskyy : मोठी बातमी! आता मोदी अन् झेलेन्स्कींचीही झाली चर्चा; जाणून घ्या, कोण काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT