Rahul Shewale Latest Marahi News Rahul Shewale Latest Marahi News
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरे शिवसेना-भाजप युतीचे पुनरुज्जीवन करण्यास उत्सुक होते - शेवाळे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : उद्धव ठाकरे हे शिवसेना-भाजप युतीचे पुनरुज्जीवन करण्यास उत्सुक होते. गेल्या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या दिल्ली भेटीदरम्यान त्यांनी या विषयावर चर्चा केली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व आणि एकनाथ शिंदे यांना सरकारचे नेते म्हणून समोर करण्याचा प्रस्तावही होता. परंतु, तो झाला नाही, असे मंगळवारी लोकसभेत पक्षाचे नेते म्हणून नियुक्त झालेले राहुल शेवाळे (Rahul Shewale) गुरुवारी (ता. २१) म्हणाले. (Rahul Shewale Latest Marahi News)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विजयी चेहरा नाही. त्यामुळे त्यांनी भाजपशी युती करणे आवश्यक होते. शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी आगामी सार्वत्रिक निवडणुकांबाबत उद्धव यांच्यासोबत अनेक बैठकांमध्ये नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. या बैठकीला संजय राऊत देखील उपस्थित होते. निवडणुकीचा चेहरा म्हणून राऊत यांनी ठाकरे यांच्याकडे लक्ष वेधले. मी त्यांना सांगितले की, आम्ही ठाकरेंचा आदर करतो. परंतु, वास्तववादी असले पाहिजे. ते लोकसभा निवडणुकीचा चेहरा होऊ शकत नाही, असेही राहुल शेवाळे (Rahul Shewale) म्हणाले.

अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल. जी त्यांच्या कार्यकर्त्यांना मान्य होणार नाही. शेवाळे आणि अन्य ११ लोकसभा सदस्यांनी आपली भूमिका बदलून आता बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आपली निष्ठा व्यक्त केली आहे.

शिंदे गटाच्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर ३० जून रोजी शिंदे-भाजपचे सरकार स्थापन झाले. आता शिवसेनेचे अनेक नेते भाजपसोबत (BJP) युती करण्याच्या बाजूने आहे. पुढील लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास इच्छुक असल्याचे प्रतिपादन शेवाळे यांनी केले.

शिवसेनेच्या नेत्यांना असुरक्षित वाटतेय

सार्वत्रिक निवडणुकीच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेची महत्त्वाची जागा देण्याबाबत शिवसेनेच्या नेत्यांना असुरक्षित वाटत आहे. शिवाजीराव आधळराव पाटील हे शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे यांच्याकडून पराभूत झाले. त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघ सोडण्यास सांगण्यात आले, असे शेवाळे म्हणाले. मावळची जागा शिवसेनेचे श्रीरंग आप्पा बारणे यांनी जिंकली होती. मात्र, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना ती ऑफर देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

Video : ₹2,500,000,000 मध्ये बनलेल्या रणबीर-आलियाच्या आलिशान घराची झलक समोर ! असं आहे घराचं इंटिरियर

सोनी BBC अर्थने धर्मेश बरई यांचा ‘अर्थ चॅम्पियन’ म्हणून गौरव केला

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT